इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष आणि कोलकाताचे राजकुमार सौरव गांगुली यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री एका डिनर पार्टीला हजेरी लावली. शाह यांनी सौरव गांगुलीच्या घरी जेवायला हजेरी लावल्याने पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चांना जोर आला आहे. याआधीही गांगुली हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही, मात्र आता पुन्हा एकदा गांगुली भाजपमध्ये जाण्याची शक्यता बळावल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी याचा खरपूस समाचार घेतला आहे. शाह यांना बंगालची प्रसिद्ध डिश मिष्टी डोई खायला द्यावी असा संदेश त्यांनी गांगुलीला दिला आहे.
गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी रात्री उशिरा सौरव गांगुलीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी शाकाहारी जेवण केले. सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयचा सचिव आहे. गांगुलीने सांगितले की, तो शाह यांना 2008 पासून ओळखतो.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार होता. परंतु हृदयविकाराच्या किरकोळ झटक्यानंतर त्याने आरोग्याला प्राधान्य दिले. त्यामुळेच त्याचा पक्ष प्रवेश टळला. गांगुली याला थेट मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची तयारी भाजपने केली होती. गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाचे सर्वात यशस्वी कर्णधार आहे. पश्चिम बंगालमध्ये त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याला कोलकात्याचा राजकुमार म्हणूनही ओळखले जाते. अशा स्थितीत गांगुलीला सोबत घेऊन भाजपला ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला भेदायचा आहे आणि लोकसभा निवडणुकीतही आघाडी करायची आहे. बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. त्यामुळे शहांची डिनर डिप्लोमसी हा त्याचाच एक भाग आहे.
शाह-गांगुली डिनर पार्टीची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की, आपल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. मला सौरव गांगुलीला सांगायचे आहे की मिष्टी दोई (गोड दही) शाह यांना खायला द्यावे. मिष्टी डोई हा पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पदार्थ आहे.
सौरव गांगुलीच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी अमित शाह कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘मुक्ती-मातृका’ सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली आणि तिची टीम दीक्षा मंजरी यांचे नृत्य देखील झाले.
https://twitter.com/ANI/status/1522589582667448320?s=20&t=ihkKpY60ioousif8Hh18SQ