माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान हे १४ ते १५ डिग्री तर कमाल तापमान हे २६ ते २९ डिग्री दरम्यान जाणवत आहे. हे दोन्ही तापमाने सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने खालावलेली आहेत. त्यामुळे नववर्षात महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतांनाच मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. हा प्रभाव उत्तर भारतातील थंडी राजस्थान गुजराथ मार्गे कोकणात उतरत आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही थंडीचा प्रभाव हा आहेच परंतु त्यामानाने काहीसा कमी आहे. पुढील ५ दिवस थंडीचा हा प्रभाव कायम असेल असे दिसते.
कोकणाबरोबर महाराष्ट्रातील संपूर्ण खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला व अमरावती ह्या जिल्ह्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा खालावले आहे. त्यामुळे काहीशी थंडी जाणवत आहे. हळूहळू उत्तरेतील पश्चिमी प्रभावामुळे थंडी वाढू शकते. असे दिसते. उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. अपेक्षित थंडी सध्या जाणवत नाही. तरीदेखील येत्या काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1609493388130418689?s=20&t=Wdw1PryQMqUoY5RFvq20Wg
Weather Climate Cold Forecast Winter