India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यंदाही त्र्यंबकराजा चरणी! यावर्षी निवडणूक असल्याने काय साकडे घातले?

India Darpan by India Darpan
January 2, 2023
in स्थानिक बातम्या
0

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  नवीन वर्षाच्या सुरुवातीला अर्थात सोमवारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री व प्रभू त्र्यंबकराजाचे निस्सीम भक्त शिवराजसिंह चौहान यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे विधीवत दर्शन घेतले. भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण हे सहपरीवार दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीस येत असतात. चौहान यांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

या वर्षी मध्य प्रदेशची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवराज सिंह यांनी त्र्यंबकराजाला विजयाचे साकडे घातले. त्र्यंबकराजाच्या मंदिरात शिवराजसिंह चव्हाण यांनी सपत्निक पुजा अभिषेक करून आरती केली. यावेळी त्यांचे सोबत त्यांचे दोन्ही पुत्र कार्तिक व कुणाल होते. चौहाण यांनी सोवळे नेसुन गर्भगृहात जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. पौरोहित्य वेदमुर्ती श्रीनिवास तथा वामन गायधनी यांचेसह सुयोग वाडेकर, तेजस ढेरगे, बाळासाहेब कळमकर, अक्षय शुक्ल, जयदीप शिखरे, सचिन दिघे, तन्मय वाडेकर, ऋतुराज जोशी यांनी केले. देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त प्रशांत गायधनी, अॅड. पंकज भुतडा, संतोष कदम यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा देऊन सत्कार केला.

भाजपा कडून शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, त्यांचे शाल, पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी भाजपा पदाधिकारी अॅड. श्रीकांत गायधनी, पंकज धारणे, रामचंद्र गुंड, युवा मोर्चा अध्यक्ष विराज मुळे, संकेत टोके, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधिक्षक कविता फडतरे, पो.नि. संदीप रणदिवे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अश्विनी टिळे, राणी डफळ, चंद्रभान जाधव व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसिलदार दिपक गिरासे व सहकारी उपस्थित होते.

ॐ साईं नमो नम:
श्री साईं नमो नम:

आज नव वर्ष की पावन बेला पर महाराष्ट्र के शिरडी धाम पहुंचकर साईं बाबा का सपरिवार दर्शन-पूजन कर मध्यप्रदेश और देश के मंगल व कल्याण के लिए प्रार्थना की। श्री साईं बाबा की कृपा की अनवरत वर्षा से चारों ओर खुशहाली,समृद्धि और आनंद हो,यही कामना करता हूं! pic.twitter.com/r02fHUt6uY

— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) January 1, 2023

Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan Trimbakeshwar Temple


Previous Post

धर्मांतरावरुन मोठा गदारोळ! संतप्त नागरिकांनी थेट पोलिस अधिक्षकांचेच डोके फोडले (व्हिडिओ)

Next Post

या आठड्यात असा आहे थंडीचा अंदाज

Next Post

या आठड्यात असा आहे थंडीचा अंदाज

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group