रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतातील पहिले व्हॉइस नियंत्रित स्मार्टवॉच आले; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
E56V LpUYAM8ZVI

मुंबई – पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणतः चाळीस पन्नास वर्षांपूर्वी हातावर घड्याळ घालणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे, कालांतराने अनेक प्रकारच्या घड्याळांची नवीन मॉडेल बाजारात दिसू लागली. अगदी सोन्या-चांदीच्या पॉलिश केलेल्या घड्याळांना देखील ग्राहकांकडून मागणी होती.

कालांतराने 1 ते 12 अंक आणि तीन काटे असलेल्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक म्हणजे अभासी आकडे असलेली घड्याळे बाजारात दिसू लागली. काही काळाने मोबाईलमुळे हातावरची घड्याळे देखील गायब झालेली दिसू लागली. परंतु आता पुन्हा एकदा स्मार्टवॉचचे युगा उतरले आहे. अनेकांच्या हातावर स्मार्ट वॉच दिसू लागले आहेत. आता या स्मार्ट वॉचमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक अॅप आहेत. म्हणजे आपण किती किलोमीटर चाललो, आपल्या हृदयाची किती ठोके पडतात, यासारखे ॲप देखील या स्मार्टवॉचमध्ये आहेत. मात्र ही स्मार्ट घड्याळे काहीशी महागडी असतात.

आपण कमी बजेटमध्ये स्मार्ट घड्याळ शोधत असाल, तर फायर-बोल्ट कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीनतम स्मार्टवॉच लॉन्च केले आहे, त्यामध्ये कॉलिंग सपोर्ट उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर कंपनीचा असा दावा आहे की, हे स्मार्ट वॉच व्हॉईस असिस्टंट सपोर्टसह देण्यात येते, म्हणजेच तुम्ही बोलून त्यावर नियंत्रण ठेवू शकाल, असे हे पहिलेच घड्याळ आहे. सदर कंपनीने Fire-Bolt AI हे भारतात नवीनतम स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. व्हॉईस असिस्टंट, ब्लूटूथ कॉलिंग फीचर, हार्ट रेट ट्रॅकर, SpO2 मॉनिटर यासारख्या वैशिष्ट्ये या घड्याळात देखील आहे. या स्पेशल घड्याळाच्या किंमती आणि वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू या…

हे आहेत फिचर्स
घड्याळातील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे AI व्हॉईस असिस्टंट फीचर होय. Flipkart सूचीनुसार, फायर-बोल्ट AI हे Google/Siri व्हॉइस असिस्टंट ऑफर करणारे पहिले स्मार्टवॉच आहे. या वैशिष्ट्यासह, कोणीही फक्त बोलून हवामानाविषयी नवीनतम अपडेट मिळवू शकतो, तसेच संगीत नियंत्रित करू शकतो. आणखी बरेच काही करू शकतो. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ब्लूटूथ कॉलिंग होय. त्याच्या सेल्फ (स्वयं) स्पीकर आणि माइक सेटअपमुळे तुम्ही घड्याळातून फोन कॉल करू शकता आणि कॉलचे उत्तर देऊ शकता.

म्युझिक व कॅमेरा नियंत्रित करू शकतो
या घड्याळ्यात 240×280-पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.7-इंच टच स्क्रीन डिस्प्लेसह देण्यात येतो, त्याच्या बाजूला एक म्युट बटण देखील आहे. हे घड्याळ हृदय गती, रक्त-ऑक्सिजन लेव्हल, तणाव, झोप, बीपी आणि मासिक पाळी यांचा मागोवा घेण्यास किंवा माहिती देण्यात सक्षम आहे. याशिवाय स्मार्टवॉच अलार्म, टाइमर, सेडेंटरी रिमाइंडर, वेदर अपडेट, ब्राइटनेस कंट्रोल आणि मल्टिपल वॉच फेससाठी देखील सपोर्ट मिळतो. या घड्याळातून म्युझिक (संगीत ) आणि कॅमेरा देखील नियंत्रित करू शकता.

फ्लिपकार्टवर उपलब्ध
एकदा चार्ज केल्यावर, फायर-बोल्ट AI हे 10 दिवसांपर्यंत चालेल असे रेट केले जाते. हेघडयाळ धूळ आणि पाणी प्रतिरोधक असून 5 रेटिंग आणि 10 स्पोर्ट्स मोड ट्रॅकिंग यांचा समावेश आहे. फायर-बोल्ट AI स्मार्टवॉच काळा, निळा, राखाडी आणि गुलाबी या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याची किंमत 4,499 रुपये आहे आणि फ्लिपकार्टवर काल म्हणजेच दि. 16 नोव्हेंबरपासून उपलब्ध झाले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुम्हाला पेट्रोल पंप उघडायचा आहे? असा करा अर्ज

Next Post

जिद्द! वडिलांच्या आजारपणानंतर स्वतः शेती करणाऱ्या युवतीची भन्नाट यशोगाथा

Next Post
Ee3mRyIVoAIGtrz

जिद्द! वडिलांच्या आजारपणानंतर स्वतः शेती करणाऱ्या युवतीची भन्नाट यशोगाथा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011