बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीरशैव- लिंगायत समाजाची मोठी घोषणा; राजकीय पक्ष स्थापन करणार, उद्या लातूरमध्ये भव्य सोहळा

by India Darpan
जानेवारी 27, 2023 | 4:26 pm
in राज्य
0
images 5

विठ्ठल ममताबादे
कपाळावर भस्म, गळयात इष्टलिंग व भगवान शिवाला दैवत मानणाऱ्या वीरशैव- लिंगायत समाजातील जाती-उपजातींना संघटीत करुन सामाजिक न्यायासाठी मागील २७ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणारी एकमेव प्रबळ संघटना म्हणून शिवा संघटनेचा उल्लेख केला जातो. २८ जानेवारी १९९६ साली शिवा संघटनेची स्थापना झाली. त्या दिवसापासून शिवा संघटनेनी समाजासाठी शेकडो कामे केली असून समाजावर होणाऱ्या अन्याय,अत्याचाराविरुध्द प्रचंड व तीव्र आंदोलन करुन समाजाला न्याय मिळवून दिल्याचे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत.देशातील उपेक्षित, वंचित घटकांना, बहुजन समाजाला कष्टकरी समाजाला एकत्र करून या समाजाची वज्रमूठ बांधून नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा लातूर येथील शिवा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात होणार आहे.त्यामुळे यंदाचा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा २७ वा वर्धापन दिन अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. संपूर्ण राज्याचे या गोष्टीकडे लक्ष लागून राहिले आहे. शिवा संघटना आपली राजकीय भूमिका या वर्धापन दिनी जाहीर करणार असल्याने या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

महात्मा बसवेश्वर जयंती शासन स्तरावर साजरी करणे, बेरोजगारांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थीक विकास महामंडळाची मागणी, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक उभा करणे विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहात महात्मा बसवेश्वर प्रतिमा लावणे, संत शिरोमणी संत मन्मथ स्वामी यांच्या समाधीची शासकीय महापूजा करणे, कपिलधार मांजरसुंबा जि .बीड ला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देणे, कपिलधारच्या विकास कामासाठी १०० कोटीचा विकास आराखडा मंजूर करणे, वीरशैव लिंगायत समाजातील १६ जातींना ओबीसी व तीन जातींचा एस.बी.सी आरक्षण देणे हे आरक्षण केंद्र सरकाने लागू करण्यासाठी पाठपुरावा करणे, भक्तीस्थळाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे, डॉ .शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना राष्ट्रसंत ही पदवी देणे, मठमंदीराच्या संरक्षणासाठी वीरशैव लिंगायत बोर्ड स्थापन करणे, राष्ट्रसंताच्या समाधी मंदीर बांधकासाठी पुढाकार घेणे, बांधकाम त्वरीत सुरु करणे, राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य यांनी सुरु केलेल्या कपिलधार दिंडीच्या मार्गास संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग नाव देणे, विरशैव लिंगायत बांधवासाठी शिवा वीरशैव मोक्षधाम योजनेव्दारे दफन भुमीसाठी जागा उपलब्ध करुन देणे, सामाजिक, शैक्षणिक प्रबोधनात्मक व समतावादी कार्य करणाऱ्या एका संस्थेला आणि एका व्यक्तीला महात्मा बसवेश्वराच्या जयंतीदिनी अक्षयतृतीयेस शासकीय सामाजिक समता शिवा पुरस्कार देणे असे शेकडो समाजाला पोषक असणारे कार्य आजपर्यंत शिवा संघटनेने केलेले आहे.

यापूर्वी शिवा संघटनेचा वर्धापन दिन तेलंगणा, दिल्ली, श्रीलंका, लंडन अशा विविध राज्यात व व देशात मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला असून या वर्षी लातूर येथे शिवा संघटनेचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. लाखोच्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत बांधवाना संघटीत करुन शिवा संघटनेचे जाज्वल्य विचार व कार्य समाजापर्यंत पोहचविण्यासाठी लातूर येथे राजीव गांधी चौकातील बिडवे लॉन्स या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचे उद्घाटन संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना प्रा. मनोहरराव धोंडे करणार असून स्वागताध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे हे असणार आहेत.

या मेळाव्यासाठी शंभुलिंग शिवाचार्य महाराज, श्री राजेश्वर गुरु शिवलींग शिवाचार्य महाराज, शंकरलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरुराज स्वामी सिध्दलिंग महास्वामीजी, गुरुवर्य संगनबसव महास्वामीजी हे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपराव देशमुख माजी राज्यमंत्री महाराष्ट्र ,सुधाकर श्रृंगारे खासदार लातूर, संजय बनसोडे माजी राज्यमंत्री, अभिमन्यु पवार आमदार औसा, विनायकराव पाटील माजी राज्यमंत्री, बब्रुवान खंदाडे माजी आमदार उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांतअप्पा शेटे पुणे, अभय कल्लावार राष्ट्रीय उपाध्यक्ष नागपूर, डॉ .वाय बी सोनटक्के मुंबई राष्ट्रीय उपाध्यक्ष, शिवशरण पाटील बिराजदार राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी आमदार, वैजनाथ बनसोडे राज्य उपाध्यक्ष, धन्यकुमार शिवनकर राज्य सरचिटणीस, शैलेश जकापुरे पुणे राज्य उपाध्यक्ष, विठठल ताकबिडे नांदेड राज्य सरचिटणीस कर्मचारी महासंघ, मनिष पंधाडे शिवा सोशल मिडिया राज्य अध्यक्ष, रुपेश होनराव राज्य सरचिटणीस ,राज्य संघटक नारायण कणकणवाडी,सुनिल वाडकर राज्य उपाध्यक्ष, सातलिंग स्वामी राज्य सचिव यांच्यासह सर्व जिल्हा प्रमुख व कडवड मावळे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

Virshaiv Lingayar Samaj Political Party Decision

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण; पत्नीने दाताद्वारे कडाक्याचा चावा घेऊन पतीची जीभच कापली

Next Post

भरधाव कार दुभाजक ओलांडून दुचाकीवर पलटी, दुचाकीस्वार ठार

India Darpan

Next Post
accident

भरधाव कार दुभाजक ओलांडून दुचाकीवर पलटी, दुचाकीस्वार ठार

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011