India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विराट कोहलीने मुंबईत सुरू केले नवे रेस्टॉरंट; तेही या दिग्गज व्यक्तीच्या बंगल्यात (बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
October 6, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडचे दिग्गज गायक किशोर कुमार यांनी अनेक श्रवणीय सदाबहार गाणी रसिकांना दिली. त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. गाण्यांमुळे, मधुर आवाजामुळे आजही त्यांचे नाव अनेकांच्या ओठावर असते. पण आता मात्र किशोर कुमार यांचे नाव विराट कोहलीमुळे चर्चेत आले आहे. कारण विराट आता किशोर कुमार यांच्या घरात नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे.

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा किशोर कुमारांचा मोठा फॅन आहे. यामुळेच आता त्याने किशोर कुमार यांचा मुंबईच्या जुहू येथील बंगला भाड्याने घेतला आहे. विराटने पाच वर्षांसाठी हा बंगला भाड्याने घेतला असून, यात त्याने एक हाय ग्रेड रेस्टॉरंट सुरू केले आहे. विराटने त्याच्या रेस्टॉरंटचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

विराट कोहली हा फिटनेस फ्रीक आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याला क्रिकेटइतकीच वेगवेगळे पदार्थ खाण्याचीही खूप आवड आहे. मूळ दिल्लीचा असलेल्या विराटला छोले भटुरे खूप आवडतात. यामुळेच त्याने क्रिकेटसोबतच त्याची रेस्टॉरंटची चेन सुरू केली आहे. त्याने यापूर्वी दिल्लीत दोन रेस्टॉरंट खरेदी केले आहेत. तसेच काही प्रमुख शहरांमध्येही तो त्याच्या हॉटेल्सची चेन वाढवणार आहे.

विराटने त्याच्या ‘वन८ कम्युन’ या नवीन रेस्टॉरंटची झलक दाखवली. विराटने किशोर कुमार यांच्या ‘गौरी कुंज’ या बंगल्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले आहे. व्हीडिओमध्ये विराट कोहलीसोबत प्रसिद्ध होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलही दिसत आहे. दोघेही या नवीन रेस्टॉरंटला भेट देताना दिसत आहेत. यादरम्यान विराट मनीषला रेस्टॉरंटबाबत माहितीही देत आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

Virat Kohli New Restaurant in Mumbai Video


Previous Post

‘बिग बॉस’च्या घरात एंट्री घेताच किरण मानेंनी पुन्हा एकदा इंडस्ट्रीवर केला हा गंभीर आरोप

Next Post

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला?

Next Post

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group