India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘बिग बॉस’च्या घरात एंट्री घेताच किरण मानेंनी पुन्हा एकदा इंडस्ट्रीवर केला हा गंभीर आरोप

India Darpan by India Darpan
October 6, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो अशी ‘बिग बॉस मराठी’ची ओळख आहे. रविवार, २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरू झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. खरं तर सूत्रसंचालन कोण करणार याबाबत चर्चा सुरू होती. पण अखेर मांजरेकरच सूत्रसंचालन करणार हे निश्चित झालं. यंदाचं हे पर्व ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित आहे. कलर्स मराठीवरील याचा ग्रँड प्रीमियर चांगलाच चर्चेत आहे. याच ‘बिग बॉस’च्या घरात प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी स्पर्धक म्हणून एंट्री केली आहे. आणि एंट्री करताच त्यांनी तुफान फटकेबाजीला सुरू केली आहे.

अभिनेते किरण माने यांनी ‘बिग बॉस’च्या घरात दमदार एंट्री केली आणि घरात एंट्री करताच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकांना पुन्हा एकदा टीका केली आहे. घरात शिरताच त्यांनी सुरुवातीला ‘बिग बॉस’चे आभार मानले आणि त्यानंतर ते म्हणाले, “इंडस्ट्रीतल्या काही कारस्थानी लोकांनी माझ्यावर अन्याय केला. मला स्क्रीनपासून वंचित ठेवलं होतं. ६ महिने माझा जीव तडफडत होता. बिग बॉसनी आज माझ्यासाठी अडीचशे कॅमेरे लावलेत माझ्यासाठी. त्यासाठी धन्यवाद. ‘बिग बॉस’ खूप छान वाटतंय, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी राजकीय मतं मांडत असल्याच्या मुद्द्यावरून ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप निर्मात्यांवर केला, आणि त्यानंतर हा वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजला. मालिकेतील कलाकारांनी किरण मानेंच्या विरोधात भूमिका घेतली होती. तर टीव्ही जगातील काही लोकांनी किरण मानेंची पाठराखण केली होती.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची थीम ‘ऑल इज वेल’ अशी आहे. यापूर्वी एक प्रोमोमध्ये होस्ट महेश मांजरेकर यांनी या पर्वात भांडणं, गोंधळ नसणार असं म्हटलं होतं. पण ‘बिग बॉस’च्या घरात वादाची ठिणगी पडायला फारसा वेळ लागत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण यावेळी हे स्पर्धक प्रेक्षकांना काय वेगळं देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे पुढेच १०० दिवस प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन होणार हे नक्की.

आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आतापर्यंत तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, किरण माने, समृद्धी जाधव, निखिल राजशिर्के, अक्षय केळकर यांनी एंट्री केली आहे. ‘बिग बॉस मराठी – ४’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. तर आठवड्याअखेर म्हणजेच वीकेंडला शनिवार आणि रविवारी ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय हा शो तुम्हाला व्हूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दिसणार आहे.

Big Boss Marathi Actor Kiran Mane Allegation


Previous Post

१०० कोटींवरुन मातोश्री आणि उद्धवांवर निशाणा साधला; शिंदे गटाच्या या खासदाराची लॉटरीच लागली

Next Post

विराट कोहलीने मुंबईत सुरू केले नवे रेस्टॉरंट; तेही या दिग्गज व्यक्तीच्या बंगल्यात (बघा व्हिडिओ)

Next Post

विराट कोहलीने मुंबईत सुरू केले नवे रेस्टॉरंट; तेही या दिग्गज व्यक्तीच्या बंगल्यात (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group