खम्मम (तेलंगाणा) – जिल्ह्यातील रविचेट्टू बाजारपेठेत अत्यंत थरारक प्रसंग घडला आहे. एका दुकानात महिला कपडे खरेदी करीत होत्या. दुकानदार त्यांना साडी दाखवत होता. त्याचवेळी अचानक एक भरधाव दुचाकी थेट दुकानात शिरली. अत्यंत वेगाने आलेल्या या दुचाकीमुळे महिला प्रचंड घाबरल्या. सुदैवाने या महिलांना काही दुखापत झाली नाही मात्र, दुचाकीचालक मात्र फेकला गेला. दुकानाच्या काऊंटरवरुन दुचाकीचालक थेट पलिकडे पडला. त्याला मात्र दुखापत झाली आहे. वाहनचालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकरणानंतर वाहनचालकाने सर्वांची माफी मागितली आहे. दुचाकीचा ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले आहे.
https://twitter.com/jsuryareddy67/status/1458420388283572228