शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वाजवा रे! विकी कौशल आणि कतरिना कैफचा प्री-वेडिंग सोहळा आजपासून

by Gautam Sancheti
डिसेंबर 7, 2021 | 11:26 am
in मनोरंजन
0
vicky katrina3

जयपूर (राजस्थान) – सध्या केवळ मुंबई मधील बॉलीवूड क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह देशभरात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या भव्य दिव्य अशा विवाह सोहळ्याची होय, आजपासून या विवाह सोहळ्याला प्रारंभ होत असून सुमारे चार-पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात काय कार्यक्रम आहेत? आणि कोण कोणते सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत ? याची रसिकांसह सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोमवारी संध्याकाळी विकी कौशल, कतरिना कैफ आणि त्यांचे कुटुंबीय जयपूरहून मुंबईला निघाले, तेव्हा मीडियाला पाहताच या जोडप्याने हस्तांदोलन करून अभिवादन केले. विकी आणि कतरिना वेडिंग व्हेन्यू म्हणजेच विवाह स्थळी राजस्थानातील फोर्ट बरवारा येथे पोहोचले आहेत. त्यांचा विवाहपूर्व सोहळा आजपासून म्हणजेच ७ डिसेंबरपासून दुपारनंतर सुरू होत आहे. आज संगीत सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

चाहत्यांमध्ये उत्सुकता
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. आता लग्नाबाबत आतापर्यंत अनेक अपडेट्स समोर आले आहेत. आताच लग्नाच्या ठिकाणाहून एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये पाहुण्यांचे भव्य स्वागत केले जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकीकडे चाहते खूप खूश आहेत, त्याचवेळी त्यांना अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची इच्छाही आहे. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाही किल्ला दिसत आहे, या व्हिडिओमध्ये, किल्ल्याच्या भिंतींवर जोरदार रोषणाई केली जात असताना, काही जण जोधा अकबर चित्रपटातील ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ गाणे म्हणत आहेत. या गाण्याने पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत आणि या बिग फॅट ग्रँड वेडिंगचे आणखी फोटो आणि व्हिडिओ पाहण्याची त्यांची इच्छा आहे. त्याचवेळी कार्यक्रमात मोबाईलवर बंदी असताना हा व्हिडिओ कसा लीक झाला, अशी चर्चा होत आहे.

हिट गाणी गाजतील
या समारंभात तथा कॉन्सर्टमध्ये करण जोहर आणि फराह खान यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. करण जोहर हा विकी कौशलच्या बाजुने आणि फराह ही कतरिना कैफच्या वतीने गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन करणार आहे. विकी आणि कतरिनाची हिट गाणी डान्स फ्लोरवर थिरकायला तयार आहेत. कतरिनाच्या ‘बार बार देखो’ या चित्रपटातील ‘काला चष्मा’ गाण्यावर ही जोडी एकत्र नाचणार असून या चित्रपटाचा दिग्दर्शक नित्या मेहराही या लग्नात सहभागी होणार आहे.

एका खोलीचे दिवसाचे भाडे
लग्नसोहळ्याला बॉलीवूडमधील सेलीब्रीटी पाहुणे उपस्थित राहणार आहेत, यात करण जोहर फराह खान , रोहित शेट्टी, कबीर खान, मिनी माथूर, अंगद बेदी, नेहा धुपिया, शर्वरी वाघ आणि अंगिरा धर यांच्यासह इतर कलाकार पाहुणे म्हणून येणार आहेत. या | ठिकाणी बर्वरा किल्ल्याला ४८ खोल्या असून एका खोलीचे एका दिवसाचे भाडे ५० हजार ते ७ लाख रुपये आहे. त्याचवेळी, कतरिना आणि विकी कौशलसाठी स्वतंत्र सूट बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये एका दिवसासाठी एका सूटचे भाडे साडेसात लाख रुपये आहे. तसेच जवळच्या हॉटेल्स आणि धर्मशाळांमध्ये पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या वाहनांच्या चालकांसाठी आणि बाऊन्सर बुकिंग करण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

दोन्ही पद्धतीने विवाह
आजच्या संगीतकार्यक्रमानंतर ८ डिसेंबर रोजी हळदी व मेहंदी विधी पार पडणार आहे. कतरिना आणि विकी कौशल यांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतींनी होणार आहे. कतरिना आणि विकी हे भारतीय हिंदू रितीरिवाजानुसार प्रथम सात फेरे घेतील. त्यानंतर ते ख्रिश्चन प्रथेप्रमाणे पांढरे कपडे परिधान करून लग्न करतील. यापूर्वीदेखील काही अभिनेते आणि अभिनेत्री यांनी अशाच प्रकारे दोन पद्धतीने विवाह केले होते.

१२० सेलिब्रिटी 
येथील हॉटेलमध्ये सुमारे १२० पाहुण्यांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नाला हे सर्व पाहुणे उपस्थित राहणार आहेत. नुकतीच सवाई माधोपूर येथे जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये विवाह नियोजक, हॉटेल मालक, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. हा विवाह सोहळा ७ ते १० डिसेंबरपर्यंत चालणार असून त्यात कोरोनाबाबत सुरू असलेल्या नियमाची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! मुंबईत परतलेले १०९ प्रवासी गायब; ओमिक्रॉनचा धोका वाढला

Next Post

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
sitaram kunte

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011