India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! मुंबईत परतलेले १०९ प्रवासी गायब; ओमिक्रॉनचा धोका वाढला

India Darpan by India Darpan
December 7, 2021
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई – ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीती वाढत चालली आहे. भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने चिंता अधिक वाढली आहे. परदेशातून महाराष्ट्रात परतलेले १०० प्रवासी गायब झाल्याच्या वृत्ताने या चिंतेत आणखी भर पडली आहे. परदेशातून ठाणे जिल्ह्यात आलेल्या २९५ पैकी १०९ प्रवाशांबद्दल काहीच माहिती मिळत नसल्याची माहिती कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. गायब झालेल्या काही प्रवाशांचे मोबाईल फोन बंद आहेत, तर काहींच्या घराला कुलूप असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांचा असा निष्काळजीपणा कायम राहिला तर कोरोनाची तिसरी लाट कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा अधिकारी देत आहेत.

गृहविलगीकरण आवश्यक
विजय सूर्यवंशी सांगतात, जोखीम असलेल्या देशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांना ७ दिवस गृहविलगीकरणात राहणे अनिवार्य आहे. ८ व्या दिवशी त्यांची कोविड चाचणी केली जाते. जर कोविड अहवाल निगेटिव्ह आला तरीही त्यांना ७ दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन होत असेल तर हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

चार हजारांवर नागरिक परतले
देशात ओमिक्रॉन व्हेरिएंट हातपाय पसरण्याचा धोका वाढला आहे. भारतात ओमिक्रॉनने बाधित नागरिकांची संख्या सोमवारपर्यंत २३ झाली आहे. मुंबईमध्ये २ जण बाधित आढळल्यानंतर हा आकडा १२ वर पोहोचला आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड चाचणी केली जात आहे. त्यामधील १६ प्रवासी बाधित आढळले असून, त्यात १२ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. जोखीम असलेल्या देशातून ५ डिसेंबरपर्यंत ४,४८० प्रवासी परतले आहेत. यापूर्वी पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये सहा प्रवाशांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यामध्ये ३ नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे.

देशातील ओमिक्रॉनची स्थिती
महाराष्ट्राशिवाय आणखी तीन राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये राजस्थानमध्ये ९, कर्नाटकमध्ये २ आणि गुजरातमध्ये २ रुग्णांची ओळख पटवण्यात आली आहे. दिल्लीतही एक रुग्ण आढळला आहे.

तिसर्या लाटेबद्दल तज्ज्ञ म्हणाले…
सार्स-कोवी-२ चे नवे रूप ओमिक्रॉनमुळे महामारीची तिसरी लाट फेब्रुवारीपर्यंत उच्चस्तरावर राहू शकते. त्यादरम्यान देशात एक ते दीड लाख रुग्ण प्रतिदिन आढळू शकतात अशी शक्यता भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी वर्तवली आहे. तिसरी लाट दुसर्या लाटेच्या तुलनेत कमकुवत असेल. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे ओमिक्रॉन घातक नसेल असेही त्यांनी सांगितले आहे.


Previous Post

बहुप्रतीक्षा समाप्त! या तारखेपासून मिळणार ओला इलेक्ट्रिक स्कूटर

Next Post

वाजवा रे! विकी कौशल आणि कतरिना कैफचा प्री-वेडिंग सोहळा आजपासून

Next Post

वाजवा रे! विकी कौशल आणि कतरिना कैफचा प्री-वेडिंग सोहळा आजपासून

ताज्या बातम्या

खाते वाटपातून काय स्पष्ट होते? फडणवीसांचे वजन वाढले की घटले?

August 15, 2022

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न नेमका काय आहे? नाशिक जिल्ह्याचे विभाजन होणार का?

August 15, 2022

सुधीर मुनगंटीवारांचे मोठे फर्मान; फोन उचलताच अधिकाऱ्यांनी हे म्हणायचे

August 15, 2022
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! चिमुकल्याला महिलेने दिले गरम चिमट्याचे चटके

August 15, 2022
प्रातिनिधीक फोटो

टीआरपी शर्यतीत ही मराठी मालिका ठरली नंबर १; बघा, तुमची मालिका कुठल्या क्रमांकावर

August 15, 2022

अविवाहित महिलांच्या लाभासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

August 15, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group