इंडिया दर्पण – विचार पुष्प – आपण त्याचेच ऐकतो
आपले हे मर्यादित स्वरुपाचे जग आहे. त्यात जो कोणी मनःपूर्वक आपल्या सर्व शक्ती एकवटून मानवतेस खालच्या पातळीवर नेतो, भ्याडपणाच्या गोष्टींना तोंड देऊन त्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करतो, सतत अन्यायाविरुद्ध झगडण्याचे स्व कर्तव्य करीत असतो अशा कडूनच कोणीही दोन शब्द ऐकेल. बोलणाऱ्याचा आवाज अथवा ढंग कसाही असो, भाषण उत्तेजक असो वा नसो, बोलणारा बाल असो वा वृद्ध असो, त्यावर काहीच अवलंबून नसते. आपल्या हितार्थ झटणारा सतत सहकार्य देणारा, परोपकार रत असणारा, मग तो कसाही असो, त्याचे चार शब्द ऐकण्यास आपणास आवडते. कारण निरंतरच्या या जीवन संग्रामात अशाच सहकाऱ्यांच्या सहाय्याने आपण विजयी होऊ, अशी आशा करण्यास काही जागा असते. तरी “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या सूत्राप्रमाणे आपण वागू या…