इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य नांदावे असे वाटते. तसेच घरात नेहमी आनंदी वातावरण असावे, पैसा किंवा संपत्ती कायम घरात असावी, असे वाटते याकरीता आजच्या काळात वास्तू शास्त्रानुसार घर बांधण्यात येतात किंवा त्याची रचना करण्यात येते. या गोष्टीवर अनेकांचा विश्वास असतो, त्याचप्रमाणे घरात कोणत्या वस्तू कुठे ठेवायची याचे देखील काही नियम आहेत.
वास्तूशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून ऊर्जा बाहेर येते. या ऊर्जेचा व्यक्तीवर वाईट किंवा चांगला परिणाम होतो. त्यामुळे घरात कोणतीही वस्तू ठेवताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अन्यथा वास्तुदोष होतो. तसेच घरात आरसा लावताना वास्तूची विशेष काळजी घ्यावी. कारण त्याचा व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो.
घरात आरसा लावताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घ्या…
– भिंतीवर कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला आरसा लावू नये. तो पाहणाऱ्या व्यक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे घरात नेहमी कलह होत राहील.
– वास्तूनुसार आरसा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा. या दिशेला ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.
– घरामध्ये कधीही तुटलेला आरसा ठेवू नका. जर घरात आरश्याची काच थोडीशीही तुटली असेल तर लगेच फेकून द्यावी. अन्यथा नकारात्मक ऊर्जा अधिक वाढेल.
– आरसा कधीही अस्वच्छ ठेवू नये. कारण वास्तूनुसार, काचेच्या घाणामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते.
– बेडरूममध्ये आरसा असेल तर तो नेहमी अशा दिशेला ठेवा की झोपताना तुमच्या शरीराचा एक भागही त्यात दिसू नये. अशा प्रकारे आरसा लावल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
– जर बेडरूममध्ये दुसरी दिशा नसेल तर रात्री झोपताना आरशात कापड लावा, यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल.
– घरात आरसे लावताना लक्षात ठेवा की, दोन आरसे एकमेकांकडे तोंड येत नाहीत. याची काळजी घ्या, अन्यथा यामुळे घरात तणाव निर्माण होईल.
– बाथरूममध्ये आरसा लावताना लक्षात ठेवा की तो अगदी दरवाजासमोर नसावा. त्यामुळे वास्तू दोष निर्माण होतात.
– स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे या ठिकाणी अजिबात लावू नका.