वणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हॉटेलमध्ये खुर्चीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन चार जणांनी एकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना वणी गावात घडली. धक्का लागल्याने झालेल्या भांडणाचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या जखमीच्या वडिलांना या चौघांनी मारहाण केली. यात ते किरकोळ जखमी झाले तर तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर वणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिस स्थानकात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी मारहाण करणा-यांनी मुलाच्या वडिलांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तीघांना अटक केली असून एक जण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.