मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील स्टार हॉटेलच्या मागे काही संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजताच पवारवाडी पोलिसांच्या पथकाने छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले. या दरोडेखोरांकडून तीन धारदार हत्यार व एकगावठी कट्टा आणि तीन जीवंत काडतूससह ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.