सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजपासून प्रेमाच्या हंगामी उत्सवाला सुरवात झाली आहे. तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. फेब्रुवारीला प्रेमाचा महिना असे ही म्हंटले जाते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रेमाच्या परीक्षेचे दिवस सुरू होतात.आणि ही परीक्षा होते १४ फेब्रुवारीला ,म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला.ही अशी परीक्षा आहे जिची उत्सुकता सर्वाना अगदी सुरवाती पासूनच असते. तथापि, व्हॅलेंटाईन डे केवळ एका दिवसासाठी साजरा केला जात नाही. प्रेमाचा उत्सव संपूर्ण आठवडाभर चालतो. व्हॅलेंटाईन डे पूर्वी, लोक रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे देखील साजरा करतात आणि प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे.
रोज डे (७ फेब्रुवारी)
पहिला दिवस म्हणजे रोज डे. म्हणजेच, प्रेमाने भरलेल्या सप्ताहाची सुरुवात गुलाबाच्या गंधाने आणि सौंदर्याने होते. या दिवशी प्रेमा जोडपे एकमेकांना लाल गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.
प्रपोज डे (8 फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी प्रेमी आपल्या मनातील भावना व्यक्त करतात.म्हणजेच या दिवशी आपल्या जोडीदाराल प्रपोज केले जाते.
चॉकलेट डे (9 फेब्रुवारी)
कोणत्याही नात्यात प्रेम असेल तर गोडवा आपोआप विरघळतो. तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. ज्यामध्ये जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतात.
टेडी डे (10 फेब्रुवारी)
हृदय टेडीसारखे नाजूक असते आणि प्रत्येक कोमल हृदयात एक मूल असते. त्यामुळे व्हॅलेंटाइन आठवड्यातील एक दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना टेडी बेअर भेट देतात
प्रॉमिस डे (११ फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारीला जोडप्यांसाठी एक विशेष वचन दिन असतो. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला सदैव तुमच्यासोबत राहण्याचे, त्यांना आनंदी ठेवण्याचे आणि बरेच काही वचन देऊ शकता.
हग डे (१२ फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात.
किस डे (१३ फेब्रुवारी)
शब्दांविना सुद्धा प्रेम व्यक्त केले जाते आणि म्हणूनच 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन डे हा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. या आठ दिवसांच्या प्रेमपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या रसिकांसाठी १४ फेब्रुवारी हा निकालाचा दिवस आहे. या दिवशी प्रियकरासोबत एकमेकांच्या सहवासात व्हॅलेंटाईन डे साजरी केला जातो.
व्हॅलेंटाईन डे चे खरे महत्व…..
व्हॅलेंटाईन डे रोममधील तिसऱ्या शतकातील ख्रिस्ती धर्माधिकारी मंडळातील पुरुष सभासद सेंट व्हॅलेंटाईन,यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. तथापि, सेंट व्हॅलेंटाइनच्या सभोवतालच्या अनेक दंतकथा कालांतराने विकसित झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून, या सणाचे अत्याधिक व्यापारीकरण झाले आहे. लोक त्यांच्या जोडीदारांसाठी भव्य नियोजन करत, प्रेम आणि सहवास साजरी करत असताना दिसतात.