प्रमोद गायकवाड, नाशिक
सुरगाणा तालुक्यातील बाफळून हे गाव गेली अनेक वर्षे दुष्काळाचा सामना करत होतं. काही महिन्यांपूर्वी या गावच्या लोकांनी सोशल नेटवर्किंग फोरम (एसएनएफ)च्या कार्यालयात येवून पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती केली होती. फोरमच्या टिमने सर्व पहाणी करून काम सुरू केले. मुंबईच्या सिरमॅक्सो केमीकल्स कंपनीने आर्थिक मदतीचा हात दिला. ग्रामस्थांनी श्रमदान केले. ग्रामपंचायतनेही सहकार्याचा हात दिला आणि सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून मागच्या आठवड्यात गावात पाणी पोहोचले.
खरे म्हणजे एक वर्षापुर्वीच इथले काम सुरू केले होते पण काही ना काही अडचणी येत गेल्या आणि ऊशिर होत गेला. दोन महिन्यांपासून मात्र ग्रामस्थ आणि आमच्या टिमने अहोरात्र मेहनत करून गावात पाणी पोहोचवले. गावातील महिलांचे आनंदाश्रूंनी पाणावलेल्या डोळ्यांच्या साक्षीने काल या प्रकल्पाचे दिमाखात लोकार्पण झाले. यांनतर एसएनएफ टिम अतिशय समाधानाने पुन्हा नाशकात परतली… पुढील गावाच्या तयारीसाठी… या योजनेत गावापासून दोन किलोमीटरवर एक विहिर होती जिला बारमाही पाणी असतं. या विहीरीवरून पाईपलाईन करण्यात आली. यापूर्वी झालेल्या अयशस्वी योजनेतील टाकी पडून होती. तिला दुरूस्त करून वापरण्यात आली आणि टाकीतून पाणी गावातील स्टँडपोस्टवर पोहोचवण्यात आले.
विशेष योगदान
सौ. हेमा भाटवडेकर, प्रमोद गायकवाड, इंजि. प्रशांत बच्छाव, डाॅ. पंकज भदाणे, डाॅ. निलेश पाटिल, विजय भरसट, संदिप डगळे, सरपंच परशुराम चौधरी, पांडुरंग चौधरी, छगन चौधरी, सुभाष धुम, रामदास शिंदे, संदिप बत्तासे आणि ग्रामस्थ.
प्रमुख उपस्थिती
यशपाल मोरे, मा. आ. J P गावीत, जयदिप गायकवाड, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, वसंत बागुल, चंद्रकांत वाघेरे, रोहीणी वाघेरे, मुख्याध्यापक राऊत सर, चौधरी सर व बाफळुन ग्रामस्थ