नवी दिल्ली – वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरणाकडे बळकट हत्यार म्हणून पाहिले जात आहे. भारतासह जगभरातील देश कोविड लशींच्या महत्त्वावर भर देत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी काही देशांनी तेथील नागरिकांसाठी जीवघेण्या आजाराविरोधात लस घेणे अनिवार्य केले आहे. या देशांनी लसीकरणाचे नवे नियम जारी केले आहेत. हे नियम कोरोनाला रोखण्यासाठी योग्य उपाय असल्याचे पाहिले जात आहे. झिम्बॉब्वेमध्ये सरकारी कर्मचा-यांसाठी कठोर नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये लशीचा पहिला डोस न घेणा-या कर्मचा-यांकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला जात आहे. इटलीमध्येसुद्धा काही असेच नियम तयार करण्यात आले आहेत. लसीकरण न करणा-यांसाठी कठोर नियमावली केल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिका, ताझिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि व्हेटिकनसह दक्षिण प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांमध्ये लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.