नवी दिल्ली – देशभरात १२ सप्टेंबरला वैद्यकीय महाविद्यालयात पदवी प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा २०२१ होणार आहे. या परीक्षेसाठी नियम जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षार्थी लांब बाह्याचे कपडे, उंच हिलची सँडल, बूट, बाली, नथ आदी परिधान करून परीक्षा देऊ शकणार नाहीत. नॅशनल टेस्टिंग संस्था (एनटीए) सीबीएसईच्या मदतीने या परीक्षेचे आयोजन करत आहे. कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात येणार आहे. २ ते ५ वाजेपर्यंत होणार्या या परीक्षेसाठी परीक्षार्थींना दोन तासापूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल.
काय नेऊ नये
कोणतीही वस्तू जसे पाठ्यपुस्तक, वही, कागदाचे तुकडे, ज्योमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाउच, कॅलक्युलेटर, पट्टी, रायटिंग पॅड, पेनड्राइव्ह, रबर, लॉक टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर, मोबाईल, ब्लू टूथ, इअर फोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड, बटवा, पर्स, गॉगल्स, हँडबॅग्ज, बेल्ट, टोपी, घड्याळ, बांगड्या, कॅमेरा, दागिने, धातूंच्या वस्तू, मायक्रो चीप आणि कोणतेही खाद्यपदार्थाच्या वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. मधुमेह आजार असलेल्या परीक्षार्थींनी केळ, सफरचंद आदी फळे नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. खडीसाखर आणि पारदर्शी बाटलीत पाणी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिका कशा असतील
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्राच्या चार प्रश्नपत्रिका असतील. सर्वांमध्ये दोन खंड असतील. पहिल्या खंडात ३५ प्रश्न आणि दुस-या खंडात १५ पैकी १० प्रश्न सोडवावे लागतील. सर्व प्रश्न चार गुणांचे असतील. चुकीच्या उत्तराचा एक गुण कापला जाईल.
हे आवश्य घेऊन जावे
– प्रवेशपत्र
– एक फोटो
– वैध मूळ प्रमाणपत्र. परीक्षा केंद्राच्या निरीक्षकांना द्यावे लागेल, त्याशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही.