पुणे – प्रवास करण्यासाठी तसेच विविध ठिकाणी आता कोविड -१९ लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोविड १९ लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी दोन योग्य आणि सोपे पर्याय आहेत. एक तर कोविन पोर्टलला भेट द्या किंवा आरोग्य सेतू कोविड लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करा. आता हे प्रमाणपत्र थेट व्हॉटसअॅपवर मिळविणे शक्य होत आहे.
भारत सरकारने व्हॉट्सअॅपशी सहकार्य केले असून प्रत्येकाला त्यांचे कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करणे अधिक सोपे होत आहे. MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅप चॅटबॉट डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअॅपद्वारे कोविड -१९ लस प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे यासाठी सोप्या टप्प्यांचे फक्त पालन करावे लागणार आहे.
व्हॉटसअॅपवर हे प्रमाणपत्र असे मिळवा
टप्पा 1: MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅप नंबर स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा. या साठी फोन नंबर आहे:
+91 9013151515
टप्पा 2: एकदा फोन नंबर सेव्ह झाल्यानंतर, व्हॉट्सअॅप उघडा.
टप्पा 3: चॅट सूचीमध्ये संपर्क नंबर शोधा.
टप्पा 4: चॅट सूची उघडा.
टप्पा 5: दिलेल्या जागेत डाउनलोड प्रमाणपत्र टाईप करा.
टप्पा 6: व्हॉट्सअॅप चॅटबॉट नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी पाठवेल.
टप्पा 7: ओटीपी तपासा आणि प्रविष्ट करा.
टप्पा 8: चॅटबॉट कोविड -१९ लसीचे प्रमाणपत्र आपल्या व्हॉट्सअॅपवर पाठवेल, आपण लशीचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
तसेच चॅटबॉट सर्व्हरने एरर दाखवली, तर फक्त अधिकृत CoWIN पोर्टलला भेट देऊ शकता किंवा कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आरोग्य सेतू वर जाऊ शकता.