इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भूस्खलनामुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या जोशीमठ-औली रोपवेच्या प्लॅटफॉर्मला तडे गेले आहेत. धोका लक्षात घेता रोपवेचे काम थांबवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री रोपवेवर दरड कोसळली आहे. प्रशासनाने असुरक्षित घोषित केलेल्या परिसरात रोपवेचा एक टॉवर आहे, त्यामुळे रोपवेबाबतची भीतीही वाढली आहे.
जोशीमठमध्ये दरड कोसळल्याने जोशीमठ-औली रोपवेलाही फटका बसला आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी प्रशासनाने चार वॉर्ड असुरक्षित घोषित केले होते, त्याच ठिकाणी मनोहरबाग वॉर्डही असून येथे रोपवेचा एक नंबर टॉवर बसवण्यात आला आहे. रोपवेचे व्यवस्थापक दिनेश भट्ट यांनी सांगितले की, रोपवेच्या टॉवरवर दररोज नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे.
या रोपवेचे जोशीमठ ते औली हे अंतर सुमारे चार किमी आहे. त्यात 10 टॉवर आहेत. रोपवेने जोशीमठहून औलीला जाण्यासाठी १५ मिनीटे लागतात. औलीला जाण्यासाठी रोपवे ही पर्यटकांची पहिली पसंती आहे. जोशीमठ दुर्घटनेतून धडा घेत राज्य मंत्रिमंडळाने सर्व डोंगरी शहरांचे वहन क्षमता सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात सर्वेक्षण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. लोकसंख्या आणि अव्यवस्थित बांधकाम क्रियाकलापांमुळे डोंगरी शहरांवर त्यांच्या वहन क्षमतेपेक्षा जास्त दबाव वाढत आहे. जोशीमठ दरड कोसळण्यामागील एक कारण म्हणजे शहरातील भार वहन क्षमतेपेक्षा जास्त बांधकाम हे देखील आहे.
Uttarakhand Joshimath Auli Ropeway Cracks Landslide