नवी दिल्ली (इंडिया दर्पण डेस्क) – प्रगत 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर आता वैद्यकीय क्षेत्रातही अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहे. टायटॅनियम क्रॅनियोप्लास्टी या शस्त्रक्रियेसाठी तरुण रुग्णाच्या डोक्याच्या कवटी संबंधित दोषाचे निराकरण या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आले आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडच्या डॉक्टरांच्या पथकाचे कौतुक केले आहे. या शस्त्रक्रियेबद्दल भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडने केलेल्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले; “प्रशंसनीय!”
#IndianArmy
In a pioneering surgery, #SuryaHealers
rehabilitated a young patient's skull defect using advanced 3D printing technology for titanium cranioplasty repair. They join an elite group in the #Country to successfully accomplish this procedure. @adgpi@ProDefLko pic.twitter.com/TMhV78EIMK— SuryaCommand_IA (@suryacommand) February 21, 2023