मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उर्फी जावेद हिच्याविरोधात दंड थोपटणे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या प्रकरणात त्यांच्या पाठिशी भाजपमधील एकही वरीष्ठ नेता उभा नाही. अश्यात चित्रा एकाकी हा लढा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय उर्फी जावेदही त्यांना दररोज डिवचत असल्याने सोशल मिडियालाही एक खाद्य मिळाले आहे.
उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून नंगा नाच महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष समोर आली तर थोबाडीत लावेन, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर शिवसेनेच्या सुषमा अंधारे या देखील वादात पडल्या आणि त्यांनी हीच धमकी अमृता फडणवीस आणि कंगना रनौत यांना देणार का, असा सवाल चित्रा वाघ यांना केला. एवढेच नाही तर खुद्द अमृता फडणवीस यांनी कोणते कपडे घालायचे हा उर्फी जावेदचा अधिकार आहे. तिच्या व्यवसायाची ती गरज असेल तर काय हरकत आहे, असे म्हणत वेगळेच वळण दिले. ट्वीटरयुद्धावर उर्फी आणि चित्रा वाघ यांना आपापले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. एकूणच काय चित्रा यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातून कुणीही उभं नाही, हे स्पष्ट झाल्याने त्या एकाकी पडल्या आहेत.
https://twitter.com/uorfi_/status/1612696545052495872?s=20&t=NglWA2PI0-TQ4fpUw1qI6g
फडणवीस नाराज?
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला पोलीस का अटक करत नाहीत, असा सवाल करून त्यांच्याच पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष चित्रा यांच्या विधानाने थेट फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याने ते नाराज असल्याचे कळत आहे. त्यामुळेच त्यांनी कुठलीही भूमिका वा प्रतिक्रिया यावर स्पष्ट केलेली नाही.
ट्वीटर वॉरमुळे मनोरंजन
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात दररोज सुरू असलेला ट्वीटरवॉर सोशल मिडियासाठी मनोरंजन ठरत आहे. उर्फीने चित्रा यांना सासू म्हटल्यानंतर तर करमणुकीला चांगलीच सुरुवात झाली आहे. तुम्ही आपली संपत्ती जाहीर केल्यास मी स्वतः कारागृहात जायला तयार आहे, असेही उर्फीने चित्रा यांना म्हटले होते.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1610527270690770944?s=20&t=NglWA2PI0-TQ4fpUw1qI6g
Urfi Javed Controversy BJP Leader Chitra Wagh Trouble
Politics