India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मार्चमधील शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटींचा निधी वितरीत; असा आहे शासनादेश

India Darpan by India Darpan
April 10, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मार्च २०२३ मधील अवेळी पावसामुळे शेती पिके व इतर बाबींच्या नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज शासन निर्णय काढण्यात आला आहे.

राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला.

दि.४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मादविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी असा: अमरावती विभाग २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार. एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

शासन आदेश खालीलप्रमाणे

Unseasonal Rain March 2023 Loss Compensation Fund Release


Previous Post

यंदाच्या रणजी चषकाची घोषणा; असे आहे संपूर्ण वेळापत्रक

Next Post

खाद्यपदार्थात हिंग का वापरतात.. त्याचे गुणधर्म काय… खरा हिंग कसा ओळखावा… हिंगाचे उपयोग काय आहेत… घ्या जाणून सविस्तर

Next Post

खाद्यपदार्थात हिंग का वापरतात.. त्याचे गुणधर्म काय... खरा हिंग कसा ओळखावा... हिंगाचे उपयोग काय आहेत... घ्या जाणून सविस्तर

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, २९ मे २०२३चे राशिभविष्य

May 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २९ मे २०२३

May 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे बर्थडे गिफ्ट

May 28, 2023

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group