इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातील एका घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. विद्यार्थिनींच्या अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक अनेक विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री विद्यापीठातील विद्यार्थिनींनी तीव्र आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थिनींनी या घटनेत जीवितहानी आणि जखमी झाल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी, मोहालीचे पोलिस अधिक्षक विवेक शील सोनी यांनी या प्रकरणात एकाही विद्यार्थिनीचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/Arv_Ind_Chauhan/status/1571363885470617600?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
पोलिस अधिक्षक विवेक शील सोनी म्हणाले की, ‘शनिवारी संध्याकाळी एका मुलीने व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण समोर आले. नंतर अफवा पसरली की आणखी व्हिडिओ बनवले गेले आहेत. त्यासाठी येथील काही विद्यार्थिनींनी निदर्शने केली. याप्रकरणी एफआयआर तयार करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यात आले आहे. तसेच, कुणाचाही मृत्यू झालेला नाही. कुठल्याही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्नाचा केला नसल्याचे मोहालीचे त्यांनी स्पष्ट केले. “विद्यार्थिनींच्या वैद्यकीय नोंदी घेण्यात आल्या आहेत. वैद्यकीय नोंदीनुसार कोणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही. फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे त्यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/AnilKumarVerma_/status/1571369122805739520?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
व्हिडिओ त्यांचाच
पोलिस अधिक्षक म्हणाले की, ‘आम्ही या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहोत. आमच्याकडे जी काही माहिती आणि व्हिडिओ आहेत त्याची आम्ही फॉरेन्सिक तपासणी करत आहोत. आम्ही आतापर्यंत केलेल्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, जो व्हिडिओ आहे तो त्यांचाच आहे, त्याशिवाय अन्य कोणाचाही व्हिडिओ नाही.
https://twitter.com/Ddhirajk/status/1571325080696926214?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
शिक्षण मंत्री आणि महिला आयोग
पंजाबचे शालेय शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैन्स यांनी चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शांत रहावे, दोषींना सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्याचवेळी पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांचेही या प्रकरणावर वक्तव्य आले आहे. गुलाटी म्हणाल्या की, ‘ही गंभीर बाब आहे, अतिशय दुःखद आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. आरोपींना सोडले जाणार नाही याची ग्वाही देण्यासाठी मी सर्व विद्यार्थिनींच्या पालकांना भेटण्यासाठी येथे आली आहे.
https://twitter.com/AnjaliC16408461/status/1571383623831670785?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणीवर तातडीने कारवाई करत अधिकाऱ्यांनी कलम ३५४ (सी) आयटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही कठोर कारवाई केली जाईल… जर हे सर्व आधीच चालू असेल तर मी तुम्हाला खात्री देते की हा गंभीर तपासाचा विषय आहे आणि मी या प्रकरणावर लक्ष ठेवेन. या प्रकरणात काही मुलींनी आत्महत्या केल्याची खोटी बाब पसरवण्यात आली. या सर्व अफवा आहेत, एकाही मुलीने आत्महत्या केलेली नाही आणि कोणीही रुग्णालयात नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन आयोगाने केले आहे.
https://twitter.com/AnilKumarVerma_/status/1571384593651216385?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
University Hostel Girl Student Bath Video Viral
Molestation Punjab Chandigarh University Mohali Police
Social Media Leaked