नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तश्रृंग गडावरील सप्तशृंगी देवीचे मंदिर बऱ्याच दिवसांनी सध्या भाविकांसाठी खुले झाले आहे. त्यातच देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्यात आल्याने मूळ स्वरुपातील देवीचे दर्शन आता भाविकांना होत आहे. ही बाब सध्या चर्चेत असतानाच आता सप्तशृंगी देवीचा थेट १९४८-४९ या सालातील म्हणजेच तब्बल ७४ वर्षांपूर्वीचा फोटो आता समोर आला आहे. काळाराम मंदिराचे विश्वस्त तथा महंत सुधीरदास पुजारी यांनी त्यांच्या फेसबुकवर देवीचा जुना फोटो शेअर केला आहे. महंतांनी एकूण तीन फोटो शेअर केले आहेत. त्यात १९४८- ४९ मधील देवीच्या गाभाऱ्याचा आणि मूर्तीचा फोटो तसेच काही महिन्यांपूर्वीचा आणि आताचा फोटो यांचा समावेश आहे. जुन्या फोटोमध्ये मंदिराचा गाभारा व सुंदर मूर्ती दिसत आहे.
Saptashrungi Devi 1948 Photograph Historic Pic
Nashik Temple Religious