India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री कौशल किशोर म्हणतात, ‘मी माझ्या मुलाला वाचवू शकलो नाही, तुम्ही ही काळजी घ्या’

India Darpan by India Darpan
December 28, 2022
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांचे एक वक्तव्य सध्या देशभरात चर्चिले जात आहे. आपल्या मुली आणि बहिणींचे लग्न मद्यपींसोबत करू नये, मद्यपी अधिकाऱ्यापेक्षा निर्व्यसनी रिक्षावाला किंवा मजूर चांगला, असं वक्तव्य  किशोर यांनी केले आहे. किशोर हे उत्तरप्रदेशमध्ये लंबुआ विधानसभा मतदारसंघात व्यसनमुक्ती विषयावरील एका कार्यक्रमात बोलत होते.

कौशल किशोर म्हणाले की, दारु पिणाऱ्यांचे आयुष्य खूपच कमी असते, माझा मुलगा दारुच्या आहारी गेला होता. मी खासदार आणि माझी पत्नी आमदार असताना आमच्या मुलाचे प्राण वाचवू शकलो नाही. तर सर्वसामान्य जनता काय करू शकणार आहे. कौशल किशोर यांनी आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या दुःख व्यक्त करत सांगितले की, माझा मुलगा आकाश किशोर त्याच्या मित्रांसोबत नेहमी दारु प्यायचा. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. सहा महिन्यांनंतर त्याचे व्यसन सुटेल असे गृहीत धरून त्याचे लग्न केले होते, मात्र, लग्नानंतर त्याने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली आणि अखेरीस त्याचा मृत्यू झाला. आकाशचे निधन झाले तेव्हा त्याचा मुलगा अवघ्या दोन वर्षांचा होता. त्यामुळे अमली पदार्थांमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानीबाबत लोकांमध्ये जितकी भीती निर्माण होईल तितकीच भीती निर्माण करावी, असे आमचे आवाहन आहे. त्याचप्रमाणे दारुची दुकानेही बंद करण्यात यावी असे ते म्हणाले.

मैं अपनी आखिरी सांस तक नशे के खिलाफ आंदोलन करता रहूंगा जब तक भारत देश नशे से मुक्त नहीं हो जाता।
आप सभी लोग इस आंदोलन से जुड़िए और नशामुक्त भारत निर्माण में योगदान दीजिए।

— Kaushal Kishore (@mp_kaushal) December 19, 2022

 

कौशल किशोर पुढे म्हणाले की, मुलाच्या मृत्यूनंतर आमची सून विधवा झाली. आमच्यावर अशी वेळ आली. त्यामुळे आपल्या मुली आणि बहिणींना यापासून वाचवा अशी विनंती त्यांनी जनतेला केली. आता दरवर्षी सुमारे २० लाख नागरिक अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मरतात. तसेच तंबाखू, सिगारेट आणि बिडीच्या व्यसनामुळे सुमारे ८० टक्के नागरिक कर्करोगाने मरतात, असे देखील कौशल किशोर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अमली पदार्थांमुळे जगासह आपल्या देशाला पूर्णपणे काबीज केले आहे. यापूर्वी कौशल यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय नेते तथा महापुरुषांविषयी अशीच वादग्रस्त वक्तव्य केली होती.

यही है संकल्प हमारा – नशा मुक्त हो नववर्ष हमारा।
वर्ष 2023 बनाएंगे नशा मुक्त 2023 के संदर्भ में 31 दिसंबर को शाम 04 बजे सुभाष चौक (परिवर्तन चौक) से गांधी प्रतिमा(जीपीओ) तक 202323 लोग मोमबत्ती जुलूस पदयात्रा कर वर्ष 2023 को नशा मुक्त वर्ष 2023 बनाने का संकल्प लेंगे -1/2 pic.twitter.com/bURUY1Jgv9

— Kaushal Kishore (@mp_kaushal) December 26, 2022

Union Minister Kaushal Kishore Says About Son Incidence


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हा योगसाधनेचा एक भाग

Next Post

पाकिस्तानी चाहत्याने सनी लिओनीकडे केली ही अजब मागणी; नंतर सनी म्हणाली…

Next Post
संग्रहित फोटो

पाकिस्तानी चाहत्याने सनी लिओनीकडे केली ही अजब मागणी; नंतर सनी म्हणाली...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group