नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची मतदारसंघातील मोठ्या रस्त्यांच्या संदर्भात बैठक घेतली. ज्या मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग जात आहेत त्यांची स्थिती तसेच नव्याने करायच्या असलेल्या मार्गाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. संसदेतील कार्यालयात ही बैठक नुकतीच पार पडली.
राज्यभरातील महामार्ग या विषयावर गडकरींनी या बैठकीत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही बैठकीत सहभागी झाले होते. गडकरी सध्या आपल्या अधिकारांचा राज्यात सर्वत्र उपयोग व्हावा, या उद्देशाने जोरदार काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना एकत्र बोलावून बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीतून राज्यात कोणत्या मतदारसंघात रस्त्याची कोणती कामे करायची आहेत, याचा आढावा घेतला. ही सर्व कामे मार्गी लागतील, असं आश्वासनही गडकरी यांनी संबंधित खासदारांना दिल्याची माहिती आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाबाबत अमोल कोल्हेंनी गडकरी यांना या बैठकीत निवेदन दिले. नितीन गडकरी यांच्याकडं गेल्यानंतर ते कोणाचही काम करतात साऱ्यांचा, असा अनुभव आहे. त्यामुळे ते भाजपचे नेते असले, तरी सर्व पक्षांमधील नेते त्यांना मानतात. बहुतेक सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत नितीन गडकरी यांचे चांगले संबंध आहेत. खासदार हे लोकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे लोकांची कामे झाली पाहिजे, असे गडकरींना वाटते. त्यामुळे त्यांनी सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावल्याचे मत खासदारांनी व्यक्त केले.
ज्या खासदारांच्या मतदारसंघात कोणती रस्त्याची कामं रखडली आहेत त्यातील अडचणी काय याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. शिवाय आणखी कोणते महत्वाचे रस्ते करता येईल. यासंदर्भात संबंधित खासदारांशी चर्चा केली. यामुळे राज्यातील रस्तांच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे.
Union Minister Gadkari Meet All Party Maharashtra MP
Road Highways Development Work