India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांनी घेतली तातडीने बैठक; त्यानंतर म्हणाल्या…

कृषी विभागाने गावनिहाय कांदा क्षेत्राचा अचूक अहवाल तयार करावा

India Darpan by India Darpan
March 9, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात सध्या कांदा पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी, जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र व त्याप्रमाणात होणारे कांद्याचे उत्पादन यांचा अंदाज येण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील कांदा पिकाच्या एकूण क्षेत्राची माहिती घेण्यासाठी कृषी सहायकांच्या मदतीने गावनिहाय अचूक असा अहवाल तयार करावा. त्याचप्रमाणे नाफेड मार्फत जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले कांदा खरेदी केंद्रांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा दराबाबत आढावा बैठकीत डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहकार संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, दिल्ली नाफेडचे उप व्यवस्थापक निखिल पाडदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, कृषी विभाग व मार्केट कमिटी यांनी तयार केलेल्या अहवालात कांदा उत्पादनाबाबत तफावत नसावी. जिल्ह्यात कांदा उत्पादन क्षमता चांगली असल्याने निर्यात खुली आहे. कांदा निर्यात करतांना पोर्टवरील प्लगइन पॉईंट वाढविणे, कांदाचाळी व प्रक्रीया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एखादी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यात सर्वांचे सहकार्य व सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. नाफेड मार्फत सद्यस्थितीत सुरू असलेली लाल कांदा खरेदी ही केंद्र सरकारच्या वतीने कांदा उत्पादकांना दिलेला मदतीचा हात आहे. केंद्र व राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. राज्यशासन कांदा खरेदीबाबत सकारात्मक आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

नाफेड मार्फत करण्यात येणारी कांदा खरेदीचा दर टप्प्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ कांदा खरेदीसाठी देखील नियोजन करणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च व त्यानुसार होणारा नफा याअनुषंगाने कांद्याला भाव मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.
या बैठकीत उपस्थित असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधीनी कांदा दर, खरेदी व निर्यात धोरणाबाबत असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्राबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी माहिती सादर केली.

या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. डॉ. पवार म्हणाल्या की, कांद्याचे दर कोसळल्याने त्याची दखल घेण्यात आली आहे. कांदा निर्यात खुली आहे. कांद्याचे उत्पादन वाढल्याने निर्यात 2-3 वर्षांपासून खुली आहे. निर्यात धोरणात सुधारणा करण्याच्या काही प्रतिनिधींनी सूचना दिल्या आहेत. त्यावर नक्की विचार केला जाईल. 1.5 टक्के कांदा निर्यातीवर सबसिडी सुरू आहे. कांदा प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. श्रीलंका आणि बांगलादेश मध्ये आर्थिक परिस्थिती ढासळल्याने कांद्याला मागणी नाही. त्यामुळे देशांतर्गतच कांद्याची विक्री होत आहे. परिणामी, दर कमी असल्याचे पवार यांनी सांगितले.

पवार पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे. नाफेडने लाल कांद्याची खरेदी तात्काळ सुरू केली आहे.  नाफेडची मोठी यंत्रणा नाही. त्यांनी फार्मर प्रोड्युसर्स संस्था (FPO) कडून खरेदी सुरू केली आहे. फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते असे नाही. सर्वांकडून खरेदी होत आहे. नाफेडची खरेदी सातत्याने वाढते आहे. आज कांद्याला ९५० रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांनी देखील FPO कडे आपला कांदा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. पवार म्हणाल्या की, राज्य सरकारने देखील मदत करावी अशी मागणी केली आहे. राज्य सरकार देखील मदतीसाठी तयार आहे
कांद्याला हमीभाव देणं हा प्रश्न मी संसदेत उपस्थित केला आहे. कांद्याला हमी भाव दिला तर कांद्याच्या दरावर परिणाम होईल. कांद्याला सरसकट हमीभाव देणं थोडं अवघड आहे. मागच्या वर्षी नाफेडच्या वतीने अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाली. नाफेडमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. नाफेडकडे बाजार समितीत जाण्यासाठी यंत्रणा नाही. म्हणून FPO च्या माध्यमातून खरेदी होते आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाफेड आहे. आतापर्यंत 1100 शेतकऱ्यांकडून नाफेडने खरेदी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

नाफेडकडून खरेदी केला जाणारा कांदा हा शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचा असल्याची तक्रार केली जात आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, जर FPO व्यापाऱ्यांच्या असतील तर मला कागदपत्र द्या, मीच चौकशी करते. नाफेडची केंद्र कुठे आहेत याची माहिती शेतकऱ्यांना देण्याचं काम होणं गरजेचे आहे.  मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली निर्यात झाली आहे  187 टक्के जास्त निर्यात झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Union Minister Bharti Pawar Meet Onion Crisis


Previous Post

राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी झाल्या या घोषणा

Next Post

वाळुंजमधील सिडको तीनच्या जमिनी कधी डिनोटिफाय होतील? मंत्र्यांनी अधिवेशनात दिली ही माहिती

Next Post

वाळुंजमधील सिडको तीनच्या जमिनी कधी डिनोटिफाय होतील? मंत्र्यांनी अधिवेशनात दिली ही माहिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group