India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी झाल्या या घोषणा

India Darpan by India Darpan
March 9, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी शेतकरी, महिला आणि विविध घटकांसाठी विविध घोषणा केल्या आहेत. त्यात त्यांनी नाशिकसाठीही काही घोषणा केल्या आहेत. त्या कोणत्या हे आता आपण जाणून घेऊ….

नाशिक निओ मेट्रो
– नाशिक शहरासाठी नाशिक निओ मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी निधी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात प्रथमच या प्रकल्पासाठी निधी घोषित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा नाशकातील शहर वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. टायर बेस असलेली ही मेट्रो दोन टप्प्यात साकारली जाणार आहे. बारदान फाटा, गंगापूर रोड ते नाशिकरोड असा पहिला टप्पा आहे. या प्रकल्पामुळे शहरांतर्गत वाहतूक कोंडी दूर होण्यात मोठी मदत होणार आहे.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे
– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठीही राज्य सरकार निधी देणार आहे. तशी घोषणा अर्थमंत्री फडणवीस यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची प्रतिक्षा आहे. केंद्र सरकारनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. आता केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. आता राज्य सरकारनेही या प्रकल्पाची जबाबदारी घेण्याचे निश्चित केले आहे.

सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
– राज्य सरकार लवकरच लॉजिस्टिक पार्क धोरण जाहीर करणार आहे. नागपूर येथे १००० एकरावर लॉजिस्टिक हब साकारले जाईल. तसेच, नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे ६ सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारले जातील. याद्वारे राज्याच्या विकासाला आणि उद्योगाला मोठी गती दिली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

नदीजोड प्रकल्प
– दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
– नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार
– मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
– मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
– वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ

शिवचरित्रावरील उद्यान
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे हे 350 वे वर्ष. यानिमित्त या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. तसेच, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक उद्यानासाठी ५० कोटी रुपये मिळणार आहेत. परिणामी, नाशिकमध्ये ५० कोटी रुपयांच्या निधीद्वारे शिवचरित्रावरील उद्यान साकारले जाणार आहे. तर, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणार. तसेच, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Nashik Projects Fund Announcement


Previous Post

व्यवस्थापकानेच कार खरेदी विक्री व्यवहारात कंपनीस घातला २७ लाखाला गंडा

Next Post

कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांनी घेतली तातडीने बैठक; त्यानंतर म्हणाल्या…

Next Post

कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांनी घेतली तातडीने बैठक; त्यानंतर म्हणाल्या...

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group