इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बरेचदा मंत्र्यांच्या भावनिक होण्यावर कुणी विश्वास ठेवत नाहीत. पण काही प्रसंगांना परिस्थितीच अशी येते की मंत्री असो वा आमदार त्यांना अश्रू रोखणे खरच अवघड होऊन बसते. अशीच परिस्थिती एका केंद्रीय मंत्र्यावर आली आणि ते पत्रकारांपुढेच ढसाढसा रडायला लागले.
ही घटना आहे आहे पाटण्यातील. केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे पाटणा येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका मुद्यावर बोलताना त्यांना भावना अनावर झाल्या. हा विषय होता भाजप नेते परशूराम चतुर्वेदी यांच्या निधनाचा. जमिनीची योग्य किंमत आणि मोबदला मिळावा, यासाठी परशुराम चतुर्वेदी जवळपास ९० दिवस उपोषणाला बसले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पत्रकारांनी यासंदर्भात त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अश्विनी चौबे यांना रडू कोसळले. ते म्हणाले, ‘परशुराम चतुर्वेदी यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यांनी चार दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता.’ भाजपचे बक्सर येथे आंदोलन सुरू होते. यात चतुर्वेदी यांचा सक्रीय सहभाग होता. मला त्यांची अवस्था बघून दुःख होत होते. आता त्यांच्या निधनाने मला इतके दुःख झाले आहे की स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठोवू शकत नाहीये, असेही ते म्हणाले.
https://twitter.com/indiatvnews/status/1614958412160446466?s=20&t=B05cKzLytmed2BkHnr-jiw
ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
परशुराम चतुर्वेदी यांचे निधन ह्रदयविकाराच्या धक्क्याने झाले, अशी माहिती पुढे येत आहे. पण अश्विनी चौबे त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होते. अश्यात चतुर्वेदी यांच्या निधनामुळे त्यांना मोठा धक्का बसला. कारण दोघेही प्रत्येक पत्रकार परिषदेत एकत्र होते. त्यामुळे याबद्दल बोलताना चौबे यांना अश्रू अनावर झाले.
https://twitter.com/ZeeBiharNews/status/1614945658238308352?s=20&t=B05cKzLytmed2BkHnr-jiw
Union Minister Ashwini choubey wept bitterly in Press Conference