India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नॉटरिचेबल का होत्या? माघारीसाठी दबाव? महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का? शुभांगी पाटलांनी सगळं सांगितलं…

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in राज्य
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचे नॉट रिचेबल होणे, सर्वांना धक्का देणारे होते. दिवसभर अनेक लोक त्यांचा फोन ट्राय करत होते, पण त्या नॉट रिचेबल आल्याने निवडणुकीने आणखी कोणते वळण घेतले, याबाबत चर्चा सुरू झाली. अश्यात त्या थेट विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्यामुळे चर्चा थांबली.

शुभांगी पाटील विभागीय आयुक्त कार्यालयात आल्यानंतर त्यांनी आपण उमेदवारीवर कायम असल्याचे स्पष्ट केले. आपल्यावर कुणाचाही दबाव नाही. धनशक्ती जिंकणार की जनशक्ती, हे वेळच ठरवेल, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्या शुभांगी पाटील यांना अखेरपर्यंत एबी फॉर्मच मिळाला नाही. शिवाय भाजपनेही कोणताच उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे भाजपची भूमिकाच संशयास्पद असल्याचे जाणवू लागले. अश्यात काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाल्यावरही डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि मुलगा सत्यजित तांबेला अपक्ष निवडणूक लढवायला सांगितले. भाजप तांबेंच्या पाठिशी असल्याचे बोलले जात आहे. पण शुभांगी पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून महाविकास आघाडीचे समर्थन असल्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडी माझ्या सोबत आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

नॉट रिचेबल शुभांगी पाटील समोर आल्यावर काय म्हणाल्या? #ShubhangiPatil #SudhirTambe #SatyajeetTambe #UddhavThackeray pic.twitter.com/rGO8bZRi0C

— Mumbai Tak (@mumbaitak) January 16, 2023

भाजप नेमके कुणासोबत?
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पाठिशी भाजप असल्याचे बोलले जात असतानाच दुसरे अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. एक तासाच्या चर्चेत त्यांनी भाजपला पाठिंबा मागितल्याचे सांगितले.
ठाकरे गट सोबत नाही
शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीचा पिठांबा मागितला असला तरीही उद्धव ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा दिलेला नसल्याचा दावा दुसरे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे.

Nashik Graduate Election Candidate Shubhangi Patil Says
Politics Vidhan Parishad


Previous Post

…केंद्रीय मंत्री कॅमेऱ्यांसमोर ढसाढसा रडले; का? असं काय घडलं? (Video)

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – १७ जानेवारी २०२३

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - मंगळवार - १७ जानेवारी २०२३

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group