India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आता यासाठी PhD बंधनकारक नाही; UGC प्रमुखांची मोठी घोषणा

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) प्रमुखांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, सहाय्यक प्राध्यापकपदासाठी आता पीएचडीची आवश्यक नाही. एका कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र, या संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उस्मानिया युनिव्हर्सिटी (OU) कॅम्पसमध्ये UGC-HRDC इमारतीचे उद्घाटन करताना, UGC प्रमुख प्रा एम जगदेश कुमार म्हणाले की, UGC NET पात्र उमेदवार हे विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर भरतीसाठी थेट अर्ज करू शकतात. पीएचडीची पात्रता असणे ही त्यांच्यासाठी कोणतीही सक्ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यूजीसी प्रमुखांच्या विधानाचा हवाला देत ताज्या मीडिया रिपोर्टनुसार, असा दावा करण्यात आला आहे की, सहाय्यक प्राध्यापकाच्या नोकरीसाठी, उमेदवारांना पीएचडी असणे आवश्यक नाही. कारण यूजीसी नेटची पात्रता म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा स्वीकारली जाईल.  या संदर्भात अधिकृत सूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही परंतु उमेदवारांना नवीनतम माहितीसाठी UGC वेबसाइट किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हजारोंना दिलासा 
आत्तापर्यंत, नियमित प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक म्हणून भरतीसाठी पीएचडी आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांमुळे हजारो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. UGC लवकरच याबद्दल तपशीलवार माहिती शेअर करेल अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी, पदव्युत्तर पदवी आणि UGC NET पात्रता असलेले उमेदवार आता देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील.

UGC Chief Big announcement for PhD Compulsion


Previous Post

भाजप आमदाराच्या साखर कारखाना घोटाळ्याचे प्रकरण सोमय्यांकडे ४वेळा पाठवले… आता ईडी कारवाई करणार? राऊतांचा सवाल

Next Post

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने दिला हा इशारा

Next Post

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने दिला हा इशारा

ताज्या बातम्या

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group