इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमेरिकेच्या सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतीवर बंधी घातली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी असं अमेरिकन दुतावास आणि काऊन्सलर कार्यालयांना सांगितलं आहे.
यामुळे अमेरिकेतल्या शाळा, महाविद्यालयात इतर देशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात मर्यादा येणार आहेत. यापूर्वी ट्रम्प प्रशासनानं हावर्ड विद्यापीठाला परदेशातल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेऊ नये असं सांगितलं होतं.
ही बंदी एफ, एम आणि जे व्हिसा श्रेणांना लागून होते. ज्यामध्ये बहुतेक आंतराष्ट्रीय विद्यार्थी आणि एक्सचेंज अभ्यासगतांचा समावेश आहे. या कार्यक्रमाकतून येणारे विदयार्थी अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करु शकतात किंवा यहूदीविरोधी वातावरणाला प्रोत्साहन देऊ शकतात. ट्रम्प प्रशासानाने इन्साग्रामा, टिकटॅाक आणि एक्स सारख्या प्लॅटफॅार्मवरील पोस्ट, लाईक्स, कमेंटस आणि शेअरर्सची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.