इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिध्दांतवर एका विवाहितेने फसवणूक, मानसिक आणि शारिरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर काही तासातच या महिलेने सर्व आरोप मागे घेतले. हे माझे वैयक्तीक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करु नये असेही या महिलने सांगितले. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार? असा सवाल केला आहे.
या महिलेने सांगितले की, हे आमचे घरगुती प्रकरण आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांनी राजकारण करु नये. संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते. सिध्दांत शिरसाट यांच्यावर केलेल आऱोप मी मागे घेतले. मी फुल स्टॅाप देत आहे. माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन कुणीही राजकारण करु नये. सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केले तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा या महिलेने दिला. त्यावरही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
दमानिया यांनी म्हटले आहे की, हे माझा वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात? घरची प्रकरणे ही सगळ्यांच्याची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा सामाजिक मुद्दा नाही का? तिने दिलेली legal notice मागे घेण्यात आली ह्यावरून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे हे स्पष्ट दिसतय. ब्लेड ने स्वतःला कापून, स्वतःवर बंदूक लावून मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन, त्या मुलीला लग्न करायला भाग पाडलं, लग्नानंतर गर्भपात करायला लावणे, आणि नंतर माझे वडील मंत्री होणार आहेत, ते शिंदांचे उजवे हात आहेत, असे म्हणून तिला तिला धमकावून वाऱ्यावर सोडलं, अशा मुलाला शिक्षा न देता त्या मुलीवर दबाव आणणं हा ‘सामाजिक न्याय मंत्र्यांचा’ न्याय आहे का? ह्या सामाजिक मंत्री मंत्रीपदाला हे लायक नाहीत. एकनाथ शिंदेंनी ह्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे
वकीला मार्फत केले होते हे आरोप केले
छत्रपती संभाजी नगरमधील वकिल चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत या महिलेने सिध्दांतला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. त्यात मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
जान्हवी सिध्दांत शिरसाट असं महिलेचं नाव असून तिने सिध्दांत बरोबर लग्न केल्याचा दावा केला आहे. जान्हवीला नांदायला नकार दिल्यामुळे या महिलेने थेट कायदेशीर मार्ग निवडला. तिने छत्रपती संभाजी नगरमध्ये येण्याचा आग्रह, पण, तिला येऊ दिलं नाही. मुंबईलाच रहायला सांगितले.
चेंबूर येथे प्लॅटवर दोन वर्षापूर्वी जान्हवीसोबत सिध्दांतने लग्न केले. त्यावेळी फॅमिली उपस्थितीत होती. दोन वर्ष चांगले गेले. पण त्यानंतर सिध्दांचे तिस-या मुलीसोबत प्रेमसंबध सुरु झाले. त्यानंतर त्याने जान्हवीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता आम्ही कायदेशीर मार्ग निवडला असून सात दिवसाच्या आत जान्हवीला नांदवण्यासाठी आम्ही कायदेशीर नोटीस दिली असल्याचे वकील ठोंबरे यांनी सांगितले.