मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा ट्रिझर ट्विटरवर पोस्ट केला आहे. २६ व २७ जुलैला ही मुलाखत प्रसिध्द केली जाणार आहे. शिवसेनेमध्ये पडलेली मोठी फुट, सत्ताबदल व शिवसेनेची पुढील वाटचाल यासारखे अनेक प्रश्न सामन्यांना पडले आहे. त्यामुळे या मुलाखतीत उध्दव ठाकरे हे सविस्तरपणे बोलणार आहे. या मुलाखती अगोदरच त्याची मोठी चर्चा आहे. त्यातच राऊत यांनी ट्रिझर ट्विटरवर पोस्ट केल्यामुळे त्याची चर्चा अधिक रंगली आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1551197580599521280?s=20&t=B9QkU02KP1wBWR-_qKrlkA