मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आदिवासी बांधवांनो, तक्रार करायची आहे? योजनेची माहिती हवीय? अर्जाची स्थिती जाणायची आहे? तातडीने या नंबरला फोन करा

फेब्रुवारी 25, 2023 | 6:46 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आदिवासी विकास विभागाने योजनांच्या माहिती व मार्गदर्शनासाठी स्वंतंत्र टोल फ्रि क्रमांक कार्यांन्वित केला असून लवकरच बहुसंवादी मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टलची स्थापना करण्यात येणार असून, त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या योजना,उपक्रम यांची सर्व प्रकारची माहिती मिळविणे अधिक सोपे व सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

नवापूर तालुक्यातील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा नूतन शालेय इमारतींच्या उद्धटन व पायाभरणी समारंभात पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जि.प.सदस्य सुनील गावित, सरपंच प्रियंका गावित, पंचायत समिती सदस्य जैन्या गावित, भिमसिंग पाडवी, निलेश प्रजापती, प्रदिप वळवी, हरिष पाडवी, कांतीलाल गावित, एजाज शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता (आदिवासी) ए. पी.चौधरी, आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. ए. काकडे, शैलेश पटेल, के.एस.मोरे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीसाठी अनेक वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती देण्यासाठी विभागामार्फत *1800 267 0007* हा टोल फ्री क्रमांक प्रजासत्ताक दिनापासून सुरु करण्यात आला आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आदी कागदपत्रे मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत या टोल फ्री क्रमांकावरुन मिळणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टच्या माध्यमातून आता प्रशिक्षणार्थी आदिवासी उमेदवारांना अभ्यासक्रमाची नोंदणी केल्यापासूनच अभ्यास साहित्य आणि अनुषंगिक माहितीचा तपशील आणि त्याबाबत काही तक्रार असल्यास त्याचे निवारण तात्काळ करण्यात येणार आहे. संभाव्य नोकरी देऊ करणारे आणि नोकरी मिळवू पाहणारे कुशल आणि प्रशिक्षित आदिवासी उमेदवार या दोघांसाठी उपयुक्त प्लेसमेंट संबंधित सर्व सेवा एकाच जागी या माध्यमातून निर्माण होणार आहेत. भरती करणारे त्यांच्या रिक्त जागांचे तपशील आवश्यक असलेल्या विशिष्ट कौशल्यांसह त्यावर पोस्ट करू शकतील. तसेच त्यांना तक्रार निवारणासह नोकरी देणाऱ्याचा अभिप्राय / रेटिंग मिळविण्यात मदत तसेच कुशल आदिवासी उमेदवारांना संभाव्य नोकरी देऊ करणाऱ्यांसोबत चॅट आणि व्हॉईस कॉल मोडद्वारे संवाद साधण्यासाठी मदत या ॲपच्या माध्यमातून होणार आहे. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सु्प्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.

टोल फ्री नंबरवर मिळणार…
– माहिती आणि मार्गदर्शनासाठी 1800 267 0007 निःशुल्क कॉल करता येणार.
– वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजनांची माहिती लगेच मिळणार.
– शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन मिळणार.
– कुठल्याही कार्यालयात न जाता सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मिळणार माहिती व मार्गदर्शन

ॲपच्या माध्यमातून मिळणार…
–
 प्रशिक्षणार्थी उमेदवारांना अभ्यासक्रमांची नोंदणी केल्यापासून अभ्यास साहित्याची माहिती मिळणार.
– तक्रार करता येणार व त्याचे निराकरणही तात्काळ होणार
– नोकरी देणारे व नोकरी इच्छुक आपली माहिती अपेक्षित कौशल्यांसह पोस्ट करणार.
– नोकरी देणाऱ्याकडून मिळणार अभिप्रायासह रेटींग.
– नोकरी देऊ करणाऱ्यांसोबत चॅट आणि व्हॉईस कॉल द्वारे संवाद साधण्यासाठी मदत होणार.

*या इमारतींचे झाले पायाभरणी आणि लोकार्पण*
शासकीय आदिवासी आश्रमशाळा,भादवड येथील शालेय इमारतीचे पायाभरणी.
शासकीय आदिवासी आश्रमशाळा देवमोगरा येथील मुलींचे वसतीगृहाचे पायाभरणी.
नवापूर शासकीय आदिवासी इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा शालेय इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह इमारतीचे पायाभरणी.
शासकीय आदिवासी आश्रमशाळा, पानबारा मुलींचे वसतीगृह इमारतीचे लोकार्पण.
शासकीय आदिवासी आश्रमशाळा, खडकी येथील मुलांचे / मुलींचे / कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण.
शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह नवापूर इमारतीचे लोकार्पण.
शासकीय आदिवासी आश्रमशाळा, धनराट येथील मुलींचे वसतीगृह इमारतीचे लोकार्पण.
शासकीय आदिवासी आश्रमशाळा, खेकडा येथील मुलांचे / मुलींचे वसतीगृह इमारतीचे लोकार्पण.

Trible Helpline Number Toll Free Service

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केजरीवाल – ठाकरे यांच्या भेटीबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले हे विधान (बघा व्हिडिओ)

Next Post

ड्रामा क्वीन राखी सावंतचा पती आदिलवर गंभीर आरोप… तो बायसेक्शुअल… त्याचा न्यूड व्हिडिओ… (व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
Next Post
rakhi sawant

ड्रामा क्वीन राखी सावंतचा पती आदिलवर गंभीर आरोप... तो बायसेक्शुअल... त्याचा न्यूड व्हिडिओ... (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011