मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने वादात राहणारी ड्रामा क्वीन राखी सावंत हीने आता स्वत:च्या मुस्लिम पतीवर गंभीर आरोप लावले आहेत. तिने केलेल्या आरोपानुसार तिचा पती आदिल खान हा बायसेक्शुअल आहे.
गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि पती आदिल खान यांच्यातील वाद वाढू लागला आहे. दरम्यान राखीने तिच्या पतीवर आरोप लावले आहेत. तिच्या मते, आदिल खानच्या डोक्यावर केस नाहीत, हे तिला माहीत नव्हते. तो टकला आहे, याची माहिती हेअर अँड स्कीन फॅक्टरीने दिली. हे ऐकून तिला धक्का बसला. तसेच तो बायसेक्शुअल असल्याचेदेखील कळले असून त्याचा एक न्यूड व्हिडीओही काहीच दिवसांपूर्वी तिने पाहिला.
पती तुरुंगात, राखी नववधूच्या वेशात
सध्या आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. याच दरम्यान, आता राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रामा क्वीन नववधू दिसत आहे. राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखीला नववधूच्या वेषात पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. राखी पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसत आहे, “मी एकदाच लग्न केले आहे, पुन्हा कधीच नाही. मला आयुष्यात पुन्हा लग्नाचा पोशाख घालायचा नाही.” आदिलबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझा एकच नवरा आहे, तो तुरुंगात आहे.”
आदिलमुळे आयुष्य उद्धवस्त
राखीला आदिलबद्दल इतकी डेस्पेरेट का आहे, असे विचारण्यात आले. तेव्हा तिने रडत रडत सांगितले, “मी डेस्पेरेट नाही. मी विचार करतेय की तो माझ्यासारख्या कणखर मुलीला कसा फसवू शकतो. माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले.”
Drama Queen Rakhi Sawant Allegation Video Viral