पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संगणक परीचारकांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या यासाठी निफाड तालुका संगणक परिचारक संघटनेकडून सोमवारपासून काम बंदचे हत्यार उपसले आहे. संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळावा यासाठी १ मार्चला मुंबईत भव्य आंदोलन होणार आहे. संगणक परीचारकांच्या विविध मागण्या कामबंद आंदोलनाला इशाऱ्याचे निवेदन निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना संघटनेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असून त्यांना किमान वेतन व कर्मचारी दर्जाची मान्यता मिळावी यासाठी वेळोवेळी शासन स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला मात्र त्याची कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलनाचा पवित्रा घेत संगणक परीचालकांनी काम बंदचा इशारा देत एक मार्च रोजी मुंबई येथे राष्ट्रातील हजारो संगणक परिचालक आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनात निफाड तालुक्यातील शेकडोच्या संख्येने संगणक परिचालक उपस्थित राहणार आहे. आणि त्या आंदोलनाची सुरुवात सोमवारपासून कामबंद करून होणार असल्याचे निवेदन निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांना देण्यात आले.
यावेळी संगणकपरिचालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आत्माराम घोटेकर, निफाड तालुका अध्यक्ष तुषार पानगव्हाणे, कार्याध्यक्ष प्रवीण मोरे, खजिनदार अक्षय सानप, उप खजिनदार महेश कापसे, उपाध्यक्ष सुरेश जाधव, महिला अध्यक्ष जयश्री पवार, उपाध्यक्ष रोहिणी आवारे, संघटक रुपाली वाघ, संघटक आरती कोटमे, रेखा निरभवणे संघटक नाना पावर, सुनिल जागृत सुनिल शिंदे व तालुक्यातील सर्व सर्व संगणक परिचारक उपस्थित होते.