येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला-नांदगाव रस्त्यावर पन्हाळ फाटा येथे एका वळणावर स्विफ्ट कार व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात पोलिस कर्मचारी दिपक पाटील यांचा मृत्यू झाला. पाटील हे नांदगाव येथून कामानिमित्त येवला येथे जात असतांना पन्हाळफाटा येथे समोरुन येत असलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक त्यांच्या कारला बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिपक पाटील हे नांदगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत होते. या घटनेची माहिती नांदगाव व येवला पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.










