चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई -आग्रा महामार्गावर वडाळीभोई शिवारात रद्दी पेपरचे बंडल घेऊन जाणा-या आयशर ट्रकला आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. नाशिक येथून सटाणा येथे रद्दी पेपरचे बंडल घेऊन जात असतांना आयशर ट्रकच्या मशिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन धूर येऊ लागल्याने ट्रक चालकाने तातडीने गाडी रस्त्याच्या बाजूला नेली. त्यानंतर गाडीतून क्लिनरसह चालकाने बाजूला पळ काढला. बघता बघता काही वेळातच गाडी संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सोमा टोल कंपनीची अग्निशामक पोहचल्यावर आगीवर नियंत्रण मिळवत आग विझविली.