नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरूळ येथील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदीराजवळील बांधकाम साईट येथे असलेले वॉचमन व बिगारी यांच्यातील वादातून वॅाचमनचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत बांधकाम साईडवर बिगारी असलेल्या कामगाराने माझ्या बहिणीकडे का बघीतले यावरून बिगारी व वॉचमन यांच्यात हा वाद झाला. या वादात वॉचमनला जीवे मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आठवडयातील खूनाची ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.