विशेष प्रतिनिधी, पुणे
भारतीय उपखंड हा मोसमी प्रदेश म्हणून ओळखला जातो. भारतासह या उपखंडातील देशांमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन ऋतू असतात, पावसाचे चार महिने सतत कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडत असतो. कधी मुसळधार कोसळतो तर कधी रिमझिम पाऊस येतो. एखाद्या वर्षी ओला दुष्काळही पडतो. परंतु देशभरात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तसेच जगात मुसळधार पाऊस कोठे होतो? हे जाणून घेऊ या…
मसीनराम (मेघालय)
भारताच्या मेघालयातील मासिनराम हे जगात सर्वाधिक पाऊस पडणारे गाव आहे. तसेच मसीनराम हे एक हिल स्टेशन असून जिथे बंगालच्या उपसागरातून येणारे ढग हिमालयातील शिखरे रोखतात आणि हे ढग येथे पाऊस पडतात. येथे सरासरी वार्षिक पाऊसमान ११,८७१ मिमी आहे.
चेरापुंजी (मेघालय)
चेरापुंजी हे देखील मेघालयातील ठिकाण असून मसिनराम पासून १५ कि.मी. अंतरावर आहे. चेरापुंजी हे जगातील दुसर्या स्थानावर आहे आणि दरवर्षी सुमारे ११,७७७ मिमी पाऊस पडतो. उन्हाळ्याच्या हंगामातही येथील तापमान २३ अंशांपर्यंत जाते आणि पावसाळ्यात येथे मुसळधार सरीमुळे वातावरण थंड होते.
तुटेन्डो (कोलंबिया)
दक्षिण अमेरिकेत स्थित कोलंबियाचे तापमान बरेच गरम आहे, परंतु येथे काही ठिकाणे ही पावसासाठी परिचित आहेत. कोलंबियामधील तुटेन्डो नावाच्या छोट्याशा ठिकाणी वर्षाकाठी ११,७७० मिमी पाऊस पडतो.
क्रॉप नदी (न्यूझीलंड)
न्यूझीलंड मधील क्रॉप नदी ९ किलोमीटर लांबीची आहे. या देशात हवामान जरी कोरडे असले तरी क्रॉप नदीच्या सभोवतालच्या भागात मुसळधार पाऊस पडतो. येथे वर्षाकाठी ११,५१६ मिमी पाऊस पडतो.
सॅन अँटोनियो (आफ्रिका)
सॅन अँटोनियो डी युरेका हे आता युरेका व्हिलेज म्हणून ओळखले जातात. हे गाव जगातील सर्वात नामांकित गावच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. कारण येथे वर्षाकाठी १०,४५० मिमी पाऊस पडतो.