India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आज आहे माधुरी दीक्षितचा वाढदिवस; अशी आहे तिची लव्ह स्टोरी

India Darpan by India Darpan
May 15, 2023
in मनोरंजन
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील डान्सिंग क्विन, कोट्यवधी तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि धकधक गर्ल नावाने ओळखल्या जाणा-या अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. १५ मे १९६७ ला मुंबईमध्ये जन्म झालेली माधुरी आज आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय चित्रपटसृष्टित अनेक वर्षांपासून सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजविणा-या माधुरी दीक्षितची जादू अजूनही कायम आहे. चित्रपट क्षेत्रात आजही ती सक्रिय आहे.

पुरस्कारांचा वर्षाव
पद्मश्री पुरस्कारासह एक डझनाच्यावर प्रतिष्ठीत पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी जवळपास १४ वेळा नामांकन मिळवून त्यात चार वेळा पुरस्कार प्राप्त करणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. तिच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिची प्रेमकहाणी कोणत्याही चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या प्रेमाची कथा सांगणार आहोत.

या चित्रपटापासून प्रारंभ
कोट्यवधी मनावर अधिराज्य गाजविणारी माधुरी दीक्षितने तिचे करिअर टॉपवर असताना डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. विवाह करण्याचा तिचा निर्णय सर्वच चाहत्यांसाठी धक्कादायक होता. केवळ १७ व्या वर्षी तिने राजश्री प्रोडक्शनच्या अबोध चित्रपटापासून आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. परंतु हा चित्रपट चालला नाही. त्यामुळे तिने पुन्हा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. परंतु माधुरीने नंतर एकच नव्हे, तर अनेक चित्रपट गाजविले. त्यानंतर ती बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री झाली.

येथे भेटली नेने यांना
डॉ. श्रीराम नेने यांच्या प्रेमात पागल झाल्यानंतर माधुरीने सर्व सोडून त्यांच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. १७ ऑक्टोबर १९९९ ला ती विवाहाच्या बंधनात अडकली. माधुरीने एका मुलाखतीत तिची प्रेमकहाणी सांगितली होती. डॉ. नेने यांच्याशी लॉस अँजेलिस येथे तिच्या भावाच्या पार्टीत पहिली भेट योगायोगाने झाल्याचे माधुरी सांगते. ती अभिनेत्री आहे आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात काम करते हे डॉ. नेने यांना अजिबात माहिती नव्हते. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली होती. त्यांंना याबाबत काहीच माहिती नव्हते.

बाईक राईडचा अनुभव
पहिल्या भेटीनंतर श्रीराम नेने यांनी तिला पहाडावर बाइक रायडिंगसाठी येणार का असे विचारले होते. पहाड आणि बाइक आहे असे ऐकल्यावर तिला चांगले वाटले. परंतु पहाडावर गेल्यानंतर ही रायडिंग अवघड असल्याचा अंदाज माधुरीला आला. त्यानंतरच नेने आणि ती एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांचे प्रेम बहरले. एकमेकांना काही दिवस डेट केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आता या दांपत्याला रियान आणि अॅरिन हे दोन मुले असून, नेने कुटुंब आनंदात नांदत आहे.


Previous Post

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण? सिद्धरामय्या की शिवकुमार? बैठकीत झाला हा निर्णय

Next Post

IPL आता आणखीनच रंगतदार… या ४ संघाचे गुण सारखेच, कुणाला संधी.. आता हे सामने चुरशीचे

Next Post

IPL आता आणखीनच रंगतदार... या ४ संघाचे गुण सारखेच, कुणाला संधी.. आता हे सामने चुरशीचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group