नवी दिल्ली – सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. देशभरात अनेक सेलिब्रिटींचे विवाह सोहळे होत आहेत. अनेक मोठ्या नेत्यांच्या आणि सेलिब्रिटींच्या घरी शहनाई वाजत आहे. बॉलिवुड सेलिब्रिटी विकी कौशल आणि कतरिना कैफने राजस्थानमध्ये सात फेरे घेतले. त्याचवेळी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही लग्नगाठ बांधली आहे. टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील कलाकार जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांच्या घरीही लग्नाची तयारी सुरू आहे. त्यांची कन्या नियती हिचा विवाह होत आहे. याच समारंभात दिलीप यांनी ठेका धरला. त्यांच्या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/tv/CXSf0F6KHfg/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता दिलीप जोशी यांची मुलगी नियती जोशी हिच्या लग्नाचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये जेठालाल जबरदस्त नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिलीप जोशी यांच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. तसेच यावर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाही येत आहेत.
दिलीप जोशी यांनी निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेले व्हिडिओत दिसत आहेत. रात्रीच्या वेळी झालेल्या संगीत कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये पाहुण्यांनी कार्यक्रमात दांडिया आणि गरबा खेळला. कन्येच्या विवाह सोळ्याला तारक मेहता शोच्या संपूर्ण टीमला आमंत्रित करण्यात आले होते. सर्वांनीच समारंभात धम्माल केली आहे.