गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतातील हे शहर आहे सोने तस्करीचा अड्डा; असे झाले उघड

by India Darpan
डिसेंबर 26, 2022 | 5:24 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोन्याला मोठे मोल आहे. त्यामुळेच त्याची जगभरातच मोठी तस्करी होते. भारतातील एक शहर सध्या सोने तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे. ते म्हणजे कोलकाता. म्यानमार, थायलंड आणि लाओसच्या सीमावर्ती भागातून तस्करी केलेले सोने कोलकात्यात आणून देशाच्या विविध भागात तस्करी केली जात आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हा खळबळजनक खुलासा केला आहे.

तब्बल ५०० किलो सोने
डीआरआयच्या म्हणण्यानुसार, म्यानमार, थायलंड आणि लाओसच्या ‘गोल्डन ट्रँगल’ सीमा भागातून सोन्याची तस्करी केली जात आहे. यासाठी कोलकाताचा वापर संक्रमण शिबिर म्हणून केला जात आहे. कोलकाता येथे आतापर्यंत सुमारे ५०० किलो सोने आणून लपवले गेले आहे, ज्याचे बाजारमूल्य सुमारे २५० कोटी रुपये आहे. येथे या टोळीचा म्होरक्या कैलास माहेश्वरी नावाचा व्यक्ती आहे. डीआरआय त्याचा शोध घेत आहे. डीआरआयचा अंदाज आहे की कोलकात्यातील काही व्यावसायिक भागात तस्करीच्या सोन्याचे ‘स्टॉक यार्ड’ तयार करण्यात आले आहे. तेथे सोने बुटके, नाणी आणि बिस्किटांच्या रूपात आहे. येथून दररोज २० ते ३० किलो सोन्याची तस्करी देशाच्या विविध भागात होत आहे.

टोळीत महिलाही
कैलास माहेश्वरीची स्वतःची ३०-३५ जणांची टोळी असून त्यात महिलांचाही समावेश आहे. दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून या टोळीतील दोघांना सीबीआयने अटक केली होती. त्याच्या चौकशीत या सर्व बाबी समोर आल्या आहेत. या सर्वांना एक कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सोन्याच्या तस्करीचे काम सोपवण्यात आले होते, कारण अशा प्रकरणात पकडले गेल्यास जामीन सहज मिळतो, असेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, डीआरआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ८३३ किलो सोने जप्त केले होते, त्यापैकी बहुतांश म्यानमार आणि बांगलादेशातून पुरवठा करण्यात आला होता.

This Indian City is Major Centre of Gold Smuggling
DRI

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हा आहे अभिनेत्री स्पृहा जोशीचा पती; तिनेच सांगितला हा पहिल्या भेटीचा किस्सा

Next Post

४ दिवसात ३४२ घरांचे बुकिंग… ६० हजाराहून अधिक नागरिकांनी दिली भेट… नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनाची यशस्वी सांगता

India Darpan

Next Post
IMG 20221225 WA0023

४ दिवसात ३४२ घरांचे बुकिंग... ६० हजाराहून अधिक नागरिकांनी दिली भेट... नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनाची यशस्वी सांगता

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011