India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या कंपनीने खरेदी केल्या हिरोच्या तब्बल १ हजार इलेक्ट्रिक स्कूटर्स

India Darpan by India Darpan
July 27, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  हिरो इलेक्ट्रिक या भारतातील सर्वांत मोठ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीने आपला डिलिव्हरी पार्टनर तसेच दुर्गम भागापर्यंत डिलिव्हरीसाठी क्राउडसोर्सिंगद्वारे चालवल्या जाणाऱ्या शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीज या भारतातील सर्वांत मोठ्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मला, १००० इलेक्ट्रिक स्कूटर्सची पहिली बॅच सुपूर्द केली आहे. हिरे इलेक्ट्रिकचे बिझनेस हेड श्री. पीयूष प्रसाद आणि शॅडोफॅक्सचे सहसंस्थापक आणि सीओओ श्री. प्रहर्ष चंद्रा यांच्या उपस्थितीत कर्नाटकातील बेंगळुरू येथे २२ जुलै, २०२२ रोजी झालेल्या कार्यक्रमात ई-स्कूटर्स सुपूर्द करण्यात आल्या.

हिरो इलेक्ट्रिकशी झालेल्या धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून, २०२५ पर्यंत आपल्या ताफ्यातील ७५ टक्के वाहने इलेक्ट्रिक असावीत, अशी शॅडोफॅक्सची योजना आहे. यात दुर्गम भागापर्यंतचे लॉजिस्टिक्स शाश्वत असावेत या हेतूने शॅडोफॅक्सचे डिलिव्हरी पार्टनर्स ईव्ही टूव्हीलर उपयोगात आणणार आहेत. आपल्या ‘नो इमिशन’ मिशनचा भाग म्हणून हिरो इलेक्ट्रिक डिलिव्हरी विभागात अनेक बीटूबी भागीदारी करत आहे. यामुळे कंब्युशन इंजिन वाहने ते इलेक्ट्रिक वाहने हे स्थित्यंतर शक्य होणार आहे. सरकार शाश्वत वाहतूक प्रकल्पांना बढावा देत असल्यामुळे, डिलिव्हरी विभागातील बी२बी ताफ्यांचे स्थित्यंतर इलेक्ट्रिक वाहनांकडे होण्यासाठी सुधारित संरचना चालना देत आहे.

हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ श्री. सोहिंदर गिल म्हणाले, “आम्हाला शॅडोफॅक्सशी झालेल्या सहयोगाचा खूप आनंद वाटतो. या १०० ई-स्कूटर्स पाठवणे म्हणजे एका दीर्घ व सहवासात्मक नातेसंबंधांची केवळ सुरुवात आहे. लास्ट-माइल डिलिव्हरी विभाग आजवर कधीही जेवढ्या वेगाने वाढला नव्हता, तेवढा सध्या वाढत आहे आणि अधिकाधिक व्यवसाय आपल्या कंपनीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शाश्वत ईव्ही परिसंस्थेकडे वळत आहेत. या सहयोगामुळे लॉजिस्टिक बाजारपेठेत एका कार्बन-मुक्त ताफ्याची निश्चिती होईल आणि त्याचबरोबर कमीत-कमी कार्बन उत्सर्जन करून ग्राहकांच्या गरजांची पूर्तताही होऊ शकेल. केंद्र व राज्य सरकारांमधील धोरणकर्ते या स्थित्यंतराला सातत्याने प्रोत्साहन देत आहेत आणि अधिकाधिक व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करत आहेत. भारतभरातील भक्कम जाळ्याच्या माध्यमातून आमच्या बी२बी ग्राहकांना ३६० डिग्री सोल्युशन्स पुरवण्यासाठी हिरोमध्ये आम्ही प्रयत्नशील असतो.”

शॅडोफॅक्सचे सहसंस्थापक श्री. प्रहर्ष चंद्रा म्हणाले, “१.२ लाखांहून अधिक मासिक व्यवहार करणारे पार्टनर्स दररोज १० लाख ऑर्डर्सची डिलिव्हरी करत असल्यामुळे, शॅडोफॅक्स खरोखरच पर्यावरणपूरक वाहतूक पर्यायांचा सक्रियपणे शोध घेत आहे. शाश्वत डिलिव्हरी शक्य करण्यावर लक्ष केंद्रित करत, आम्ही हिरो इलेक्ट्रिकशी भागीदारी केली आहे आणि आमच्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी १०० ई-स्कूटर्सची पहिली बॅच आम्हाला प्राप्त झाली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आमच्या प्रवासातील ही पहिली पायरी आहे. पुढील काही महिन्यांत आम्ही १००० ई-स्कूटर्स तैनात करणार आहोत, जेणेकरून आमची बहुतेक डिलिव्हरी वाहने ईव्ही असतील. हिरो इलेक्ट्रिकशी दीर्घ भागीदारीसाठी आम्ही उत्सुक आहोत, कारण आम्हाला ग्राहक व पर्यावरणाच्या भल्यासाठी संयुक्तपणे सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत.”

This Company buy 1 Thousand Electric Scooters from Hero


Previous Post

३ वर्षात ३९ वेळा अर्ज नाकारला, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही; अखेर ४०व्यांदा गुगलमध्ये झाला सिलेक्ट

Next Post

अर्जुन खोतकर का फुटले? शिंदे गटात का गेले? ईडी, राजकारण की अन्य काही?

Next Post

अर्जुन खोतकर का फुटले? शिंदे गटात का गेले? ईडी, राजकारण की अन्य काही?

ताज्या बातम्या

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group