मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही वेळा ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक बँकांच्या नियमांमध्ये बदल करण्यात येतात. तसेच बॅंकांमध्ये देखील व्यवहार सुरळीत होण्यासाठी हे बदल करणे आवश्यक असते असे म्हटले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ बडोदा ( BoB) चे ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आता बँक ऑफ बडोदा ग्राहकांसाठी चेकद्वारे पेमेंट करण्यासंबंधीचे नियम बदलणार आहे. त्याच वेळी, SBI आणि PNB च्या ग्राहकांसाठी पैशांच्या व्यवहारांशी संबंधित बदल केले जातील. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या-
बँक ऑफ बडोदा
१ फेब्रुवारीपासून ही बँक ग्राहकांसाठी दि.१ फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहेत. बँक ऑफ बडोदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन अनिवार्य असेल, अन्यथा ग्राहकांना त्रास होऊ शकतो. कोणतीही माहिती किंवा खात्री नसल्यास, धनादेश देखील परत केला जाऊ शकतो. बँकेने ग्राहकांना आवाहन केले आहे की, आमच्या ग्राहकांनी CTS क्लिअरिंगसाठी सकारात्मक वेतन प्रणालीच्या सुविधेचा लाभ घ्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया
बँकेने ग्राहकांना इशारा दिला आहे की, दि.१ फेब्रुवारीपासून जास्त शुल्क आकारले जाईल
आता ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करणे महागात पडणार आहे. कारण SBI च्या वेबसाइटनुसार, बँकेने १ फेब्रुवारी २०२२ पासून IMPS व्यवहारांमध्ये २ ते ५ लाख रुपयांचा नवीन स्लॅब जोडला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून बँक शाखेतून IMPS द्वारे पैसे पाठवण्याचे शुल्क २० रुपये प्लस GST असेल.
पंजाब नॅशनल बँक
ही बँक पुढील महिन्यापासून एक महत्त्वाचा नियम बदलणार आहे. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) दि. १ फेब्रुवारीपासून ग्राहकांना अलर्ट- डेबिट अयशस्वी झाल्यास २५० रुपये अनेक सेवांसाठी जास्त रक्कम आकारणार आहे. तसेच सध्या मेट्रो शहरांतील ग्राहकांच्या खात्यातील तिमाही किमान शिल्लक रकमेची मर्यादा वाढविण्यात आली आहे. याशिवाय, दि.१ फेब्रुवारीपासून, कोणत्याही हप्त्याचे किंवा गुंतवणुकीचे डेबिट पैसे उपलब्ध नसल्यामुळे ट्रान्सफर अयशस्वी झाले, तर यासाठी २५० रुपये भरावे लागतील. आतापर्यंत याची फी १०० रुपये होती. तसेच डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यास आता १५० रुपये द्यावे लागतील. यासाठी आधी १०० रुपये शुल्क आकारले जात होते.