इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कलाकार आणि त्यांच्या जीवनाबद्दल चाहत्यांना कायम उत्सुकता असते. चाहते कायम आपल्या आवडत्या कलाकाराला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. ‘द कपिल शर्मा शो’ हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावत असतात. या कार्यक्रमात कपिल शर्मासह इतर कलाकार आपल्या विनोदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.
या शोमध्ये आलेल्या प्रत्येक सेलिब्रेटी गेस्टना चहा देण्याचे काम करणारा चंदू हा देखील या शोमधील एक महत्त्वाचा कलाकार आहे. आपल्या साध्या अभिनयामुळे तो ह्या शोचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. आपल्या चहाच्या टपरीचे मार्केटिंग करण्यासाठी, शो मध्ये येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीला आपल्या हातचा चहा देणारा, चहाच्या दुकानाचे सतत मार्केटिंग करणारा चंदू संपूर्ण भारतामध्ये प्रसिध्द आहे. मात्र या चंदू चहावाल्याची म्हणजेच अभिनेते चंदन प्रभाकर यांची मालमत्ता सुमारे १५ कोटी रुपये एवढी आहे.
इंजिनीअरिंग केलेल्या चंदन यांनी आपले पॅशन फॉलो केले आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ३’ या शोमध्ये त्याने भाग घेतला होता. हा शो कपिल शर्माने जिंकला होता आणि फर्स्ट रनरअप होता चंदन प्रभाकर. याच शोमध्ये अनेक दिग्गज कॉमेडियन सहभागी झाले होते. सिराज खान, सुदेश लेहरी, राजीव ठाकूर, भारती सिंग, नवीन प्रभाकर, जशी कोचर, खयाली डिपो, श्रीवास्तव, एहसान कुरेशी हे स्पर्धक ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीझन ३’ मध्ये सहभागी झाले होते.
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर शो’पासून कपिल आणि चंदनचा एकत्र अभिनय करण्याचा प्रवास सुरू झाला. तोच प्रवास ‘द कपिल शर्मा शो’, ‘द कॉमेडी नाइट्स विथ कपिल’, ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ या शो पर्यंत सुरू आहे. कपिल शर्मा शोमधील बऱ्याच टीम मेंबर्सनी मध्ये हा शो सोडला होता. मात्र चंदनने कपिलची साथ कधीही सोडलेली नाही. आजवर तो या शोमध्ये ‘चंदू चायवाले’ हे पात्र निभावत आहे. बऱ्याच वेळा या शो मध्ये त्याने हरपाल सिंग, हवालदार, जनता सिंग, राजू, चंदू या भूमिकादेखील निभावल्या आहेत. चंदनने आजवर अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. मात्र त्याचा इतपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. चंदनला महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांचा समावेश आहे. तर चंदन एका भागासाठी ५ ते ७ लाख एवढे मानधन घेतो.
The Kapil Sharma Show Chandu Chaiwala Wealth Chandan Prabhakar