मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स हप ची वेबसाईट आणि त्याचे मालकी हक्क बघा तुमच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा करण्याच्या मार्गावर आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर केला आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सेमी कंडक्टर असे बनत नाहीत. बहात्तर लाखाचं भाग भांडवल असणाऱ्या कंपनीला 24000 करोडचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काम हे महाराष्ट्र सरकारकडून होत आहे. सदरच्या कंपनीकडे कुठलाही सेमिकंडक्टरचा एक्सपिरीयन्स नाही आणि सदरच्या कंपनीकडे कोणत्याही सेमीकण्डक्टरच्या कंपनीबरोबर चा कॉन्ट्रॅक्ट नाही. बघू आता किती करोडची जमीन फुकट देतात.
मागे हायड्रोजन निर्मिती करते म्हणून एका कंपनीबरोबर एकनाथ शिंदेंनी एक लाख करोडचं केला होता आणि ज्यावेळी ही गोष्ट मी पुढे आणली त्यावेळेला त्या कंपनीच्या सीईओने मला शोधून काढून विनंती केली होती की तुम्ही पोस्ट डिलीट करा आमचा फार मोठा नुकसान होईल.