मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावच्या कृषी बाजार समितीत सिताफळाची आवक वाढली असून रोज १२ ते १५ टन सिताफळाची व्यापा-यांकडून विक्री होऊ लागली आहे. चवीला गोड असणा-या सिताफळाला बाजार चांगली मागणी आहे. दस-या पासून सिताफळाची आवक येण्यास सुरुवात होते. डोंगरद-यातून येणारी ही सिताफळ इतर ठिकाणाहून येणा-या सिताफळापेक्षा वेगळी असून किरकोळ बाजारात ५० रुपये किलो पेक्षा जास्त दराने त्याची विक्री होत आहे. आदिवाशी पट्ट्यातील कनाशी, जयदर, अभोणा या ठिकाणाहून डोंगरद-यातील असलेली ही गावठी सिताफळ आहे. त्यामुळे त्याला चांगली मागणी आहे.